Akola : आमदारांना विकास कामांसाठी ६.४० कोटी मंजूर

प्रत्येक आमदाराला ८० लाखांचा निधी
Akola news
Akola newsesakal

अकोला : आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सन् २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आमदारांना विकास कामांसाठी शासनामार्फत प्रत्येकी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Akola news
Akola : अकोल्यात युवा साहित्यिकांची मांदियाळी

एका आमदाराला ८० लाखांचा निधी मिळाल्याने जिल्ह्यातील एकूण आठ आमदारांना ६ कोटी ४० लाखांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे आमदारांना विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतरणानंतर प्रथमच आमदार विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.

Akola news
Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात.

Akola news
Akola : कोळी समाजाची जात लिहिलेले प्रमाणपत्र एसडीओंकडून मिळावे

आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात. छोटी-छोटी कामे करून मतदारांना खुश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो.

Akola news
Akola : केशवनगरचा कारखाना सुरू होणार!

आमदार निधीतून कामे केल्यावर त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. पुढील निवडणुकीत मतांसाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. निवडून आल्यास आमदार निधीतून ही कामे करीन, असे आश्वासन प्रचाराच्या काळात दिली जातात. काही आमदार तर गल्लोगल्ली आपल्या आमदार निधीतून केलेल्या कामांची जाहिरात करीत असतात.

Akola news
Akola : कपाशीवर लाल्या; शेतकरी चिंतेत!

दरम्यान सन् २०२२-२३ या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामे करता यावी यासाठी नुकताच प्रत्येकी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील एका आमदारासाठी सदर निधी असल्याने आठ आमदारांचा ६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी नियोजन विभागाला मिळाला आहे.

Akola news
Akola : दारू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शहरात हैदोस

विकास कामांचा मार्ग सुकर

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी आमदार निधीचे २८ लाख रुपये प्राप्त झाले हाेते. त्यानंतर शासनामार्फत आणखी निधी मिळाल्याने प्रत्येक आमदाराला एक कोटी २० लाख या प्रमाणे सर्व आमदारांना ९ कोटी ६० लाख रुपये विकास कामांसाठी मिळाले. त्यानंतर आता पुन्हा प्रत्येकासाठी ८० लाख मंजूर झाले आहेत.

Akola news
Akola : लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

सदर निधी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, विधान परिषदेचे सदस्य डॉ. रणजीत पाटील, विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी व विधान परिषदेचे सदस्य वसंत खंडेलवाल यांना मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com