esakal | कोरोना अपडेट्स: आज आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: 15 more corona positive patients

कोरोना विषाणू संसर्गाचे गुरुवारी (ता. १२) १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोरोनाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

कोरोना अपडेट्स: आज आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचे गुरुवारी (ता. १२) १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोरोनाचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने गत नऊ महिन्यांपासून सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग महानगरानंतर आता गाव खेड्यातही पोहचला. त्यामुळे सर्वत्र कोरोनाची दहशत पसरली होती.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक. नागपूर यासारख्या मोठ्या शहरात सुरूवातीला रुग्ण संख्या मोठी होती. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातही वातावरण भितीदायक होते. दरम्यान आता कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याचे आता प्राप्त अहवालांवरून दिसून येत आहे. गुरुवारी (ता. १२) सुद्धा कोरोनाचे १२५ अहवाल प्राप्त झाले.

त्यापैकी ११० अहवाल निगेटिव्ह तर १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण केशव नगर येथील तीन, कौलखेड व तारफैल येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत शास्त्री नगर, दुधलाम, बीएसएनएल वसाहत कृषी नगर, लक्ष्मी नगर, तुकाराम हॉस्पिटल जवळ, शिवनी, राजेश्वर मंदिर जवळ व पातूर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.


२० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून सात, आयकॉन हॉस्पीटल येथून एक तर हॉटेल रिजेंसी येथून सहा जण, अशा एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८६२०
- मृत - २८३
- डिस्चार्ज - ८११४
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - २२३

(संपादन - विवेक मेतकर)

loading image