esakal | हेक्टरी १० हजारांची घोषणा; शेतकऱ्यांच्या पदरात ३८००!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Announcement of Rs 10,000 per hectare; 3800 in the position of farmers!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ३८०० रुपये राज्य सरकारतर्फे दिले जात आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असून, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप भापजतर्फे करण्यात आला आहे.

हेक्टरी १० हजारांची घोषणा; शेतकऱ्यांच्या पदरात ३८००!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ३८०० रुपये राज्य सरकारतर्फे दिले जात आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असून, सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप भापजतर्फे करण्यात आला आहे.


विदर्भ आणि मराठवाड्यात व राज्यातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. खरीपाची पिके हाती लागली नाही आणि इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. शेतकरी संकटात सापडला असताना सरकारने दहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचं जाहीर केलं होतं.

मात्र दोन महिने कालावधी उलटून गेल्यानंतर घोषणा केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. उलट शेतकऱ्यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. घोषणा केल्या प्रमाणे पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळत आहे ती मदत हेक्टरी १० हजार नसून हेक्टरी ३८०० रुपये मिळत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


शेतकऱ्यांची घोर निराशा
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे फार मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ठाकरे सरकारला कुठल्याही प्रकारचे गांभीर्य मदत देताना राखले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवल्याने त्यांची घोर निराशा झाल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्षांनी केला आहे.


जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच
अकोला जिल्ह्यात २५ टक्के शेतकऱ्यांनाही मदत मिळाली नाही. उर्वरित शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत आणि आता हे सरकार घोषणा केल्या प्रमाणे पैसे देत नाहीत तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून दिशाभूल केली आहे. किमान घोषणा केली तेवढी रक्कम शेतकऱ्यांना दयावी, आशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image