
कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी एका रुग्णाचा मंगळवारी (ता. ८) बळी गेला. याव्यतिरीक्त २५ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरीक्त २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. असे असले तरी सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५५ आहे.
अकोला: कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी एका रुग्णाचा मंगळवारी (ता. ८) बळी गेला. याव्यतिरीक्त २५ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरीक्त २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. असे असले तरी सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५५ आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून ३१७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २९२ अहवाल निगेटिव्ह तर २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
तसेच खासगी हॉस्पिटल येथे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सदर ६१ वर्षीय पुरूष रुग्ण सातव चौक, जठारपेठ येथील रहिवाशी होता.
त्याला २५ नोव्हेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून मंगळवारी (ता. ८) आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे मंगळवारी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सकाळी १९ जणांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील तीन, गोरक्षण रोड, डाबकी रोड, उन्नती नगर, कौलखेड व रामदासपेठ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बिर्ला कॉलनी, आदर्श कॉलनी, तापडीया नगर, मलकापूर, दीपक चौक व बैदपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी बस स्टॅण्ड, तारफैल, बाळापूर, खदान, घुसर व कौलखेड येथील रहिवासी आहेत.
कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ९७०५
- मृत - ३०१
- डिस्चार्ज - ८७४९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ६५५
(संपादन - विवेक मेतकर)