esakal | पुन्हा एक बळी; तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Another victim; Three new patients tested positive

कोरोना संसर्ग तपासणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी (ता. १२) ३९ अहवाल प्राप्त झाले.

पुन्हा एक बळी; तीन नवे रुग्ण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सोमवारी (ता. १२) ३९ अहवाल प्राप्त झाले.

त्यातील ३६ अहवाल निगेटिव्ह तर तीन अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. सदर रुग्ण उमरा पांगरा ता. पातूर येथील ५९ वर्षीय पुरुष होता. त्याला ९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान सध्याच्या स्थिती ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.


कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचे सोमवारी (ता. १२) तीन अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. संंबंधित रुग्ण जीएमसी, गीतानगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान सोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, सूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून दोन, कोविड केअर सेंटर हेंडज मूर्तिजापूर येथून ६२, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला ३९ जणांना अशा एकूण १३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७८२०
- मृत - २५६
- डिस्चार्ज - ७१८०
- ॲक्टिव्ह रुग्ण - ३८४

(संपादन - विवेक मेतकर)