नेटवर्क नसल्यामुळे बँक बंद; आठ दिवसांपासून व्यवहार ठप्प!

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 6 November 2020

गोरेगाव-माझोड परिसरातील बीएसएनएलचे नेटवर्क नसल्यामुळे गोरेगाव खुर्द येथील कॅनरा व मध्यवर्ती बँकेचे व्यवहार आठ दिवसांपासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे परिसरातील बँकेचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

माझोड  (जि.अकोला)  ः गोरेगाव-माझोड परिसरातील बीएसएनएलचे नेटवर्क नसल्यामुळे गोरेगाव खुर्द येथील कॅनरा व मध्यवर्ती बँकेचे व्यवहार आठ दिवसांपासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे परिसरातील बँकेचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षित राहातो आणि गरज असेल तेव्हा तो काढल्या जातो, याची खात्री असल्यामुळे नागरिक बँकांमध्ये आपल्या जवळील रक्कम जमा करतात.

मात्र नेटवर्क अभावी पैसे काढण्याचे व टाकण्याचे व्यवहार बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

ही अडचण एका दिवसांची असल्यास कोणीही समजून घेईल, मात्र गेल्या आठ दिवसांपासून हा प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचा व्यवहार कसा करावा या चिंतेने बँकांचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे अडचणीत सुध्दा आले आहेत. नेटवर्क नसल्यामुळे आम्ही सुध्दा त्रस्त झालो असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून नेटवर्क सुरळीत चालू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
.
बीएसएनएलच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे आम्ही त्रस्त आहोत. मात्र कॅनरा बँक ग्राहकांची परवड होऊ नये म्हणून बँकेने माझोड येथे ग्राहक सेवा केंद्र दिलेले आहे. येथील महा ई-सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- प्रदीप काजे,प्रबंधक, कॅनरा बँक, गोरेगाव खुर्द

कनेक्टिविटी नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प,
ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

मालेगाव :  बँकेत कनेक्टिविटी नसल्याने सर्वच बँकेचे व्यवहार गुरूवारी दिवसभर ठप्प झाले होते. ग्राहक सकाळपासूनच बँकेच्या दारात रांगा लावून होते. मात्र कनेक्टिविटी नसल्याने दुपारपर्यंत वाट पाहून त्यांना  घरी, तर अनेकांना बाहेर  गावी  जावे लागले  आहे.

कनेक्टिव्हिटी अभावी अनेक वेळा बॅंकाचे व्यवहार प्रभावी होतात.या सर्व प्रकारची बॅंकेला कल्पना सुध्दा असते तरीही त्यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. कनेक्टिव्हिटी नसल्याचा  सर्वात जास्त त्रास पेन्शन धारकांना  होतो,

तसेच ग्रामीण भागातील खातेदारांना सुद्धा नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तेव्हा ग्राहकांना त्रास  होऊ नये म्हणून बॅंकेत  कनेक्टिव्हिटी नसल्यास बँकेने ताबडतोब सर्व ग्राहकांना मोबाइलवर मेसेज देऊन वेळोवेळी  सूचित  करावेत त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड व त्रास होणार नाही.अशी मागणी बॅंकच्या ग्राहकातू केली जात आहे. ‌‌   ‌

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बँकेत ग्राहक पैसे काढण्यासाठी सकाळीच  रांगा लावत आहेत.मात्र बॅंकेत गेल्यावर कनेक्टिव्हिटी नाही या सबबीखाली त्यांचा हिरमोड  होऊन  त्यांना  घरी परत  जावे  लागत आहे,

तर ग्रामीण भागातील ग्राहकांना येण्याजाण्याचा   नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे..तेव्हा वरिष्ठांनी या प्रकाराची गांभीर्याने  ताबडतोब दखल घ्यावी अशी मागणी पेन्शन धारक आनंदराव रणबावळे,अंभोरे, कोकरे साहेबराव इंगळे आदीसह बॅंकेच्या खातेदारानी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Bank closed due to lack of network; Transactions stalled for eight days!