वीज चमकत असेत तर काय कराल?

Akola News: Be careful when lightning strikes
Akola News: Be careful when lightning strikes

कारंजा -लाड (जि.वाशीम) : कोरोनाच्या या वैश्विक महामारीने संपूर्ण जग होरपळून निघत असतांना निसर्गाने सुद्धा पाठ फिरवत आपला कहर करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात पावसाची सततची रिपरिप चालू राहिल्याने कारंजा तालुक्यात मुंग, उडीद पिकाचे नुकसान झाले. तर, खरिपातील सोयाबीन या पिकावर विसंबून असणारा बळीराजाची लगबग सुरु असतांना परतीच्या पावसाने वीजेच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने कारंजा तालुक्यातील दोघा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.

शिवाय, इतर जण गंभीर जखमी झाले. मात्र, वीज चमकू लागल्यानंतर नेमके काय करावे? याबाबत, ग्रामीण भागातील नागरिक आजही अनभिज्ञ आहेत. मात्र, यावर काळजी घेतल्यास विजेपासून संरक्षण मिळून जीव वाचू शकतो. 

दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यादरम्यान अवकाळी पाऊस पडतांना आपण अनेकदा पाहतो शिवाय, अनुभवतो सुद्धा तर, साधारपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होऊन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मान्सून हा परतीच्या मार्गावर असतांना पाऊस कोसळतो. मात्र, यावर्षी पावसाने सततता ठेवल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांची हातची पिके गेली.

ऑक्टोबर महिन्यात सुद्धा परतीचा पाऊस धुव्वाधार कोसळल्याने यादरम्यान सोसाट्याचा वारा, वीज चमकण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे, सद्यपरिस्थितीत कारंजा तालुक्यातील बदललेल्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी शिवाय, तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये. याकरिता, कारंजा तालुक्यातील शेतकरी वर्ग वीजेच्या कडकडाटात सुद्धा शेतात राबतांनाचे चित्र पाहायला मिळाले. यामध्ये, पिंपळगाव (गुंजाटे) येथील शेतकरी नानासाहेब टोंग तर, नारेगाव येथील वडिलांसोबत शेतात गेलेला 16 वर्षीय धीरज दोरक या दोन शेतकरी पुत्रांना आपले प्राण गमवावे लागले.

शिवाय, यांच्या सोबतचे गंभीर जखमी झाले. तेव्हा नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडणाऱ्या या वीज यापासून सावध राहावे, शिवाय, धोक्यापासून शक्य तितके दूर राहावे. 

वीज चमकतांना हे टाळा...
संगणक, टी. व्ही. इतरही तरंगाशी संलग्नित असलेल्या वस्तू बंद ठेवा.
धातूच्या वस्तू घेऊन बाहेर जाऊ नका.
पाण्यात पोहत असल्यास त्वरित बाहेर यावे.
झाडाखाली थांबू नये. 
खुल्या आकाशात म्हणजे शेतात किंवा इतरत्र उघड्यावर लोखंडी वस्तू घेऊन काम करणे टाळावे.

मोबाईलवर बोलणे टाळावे!
मोबाईलवर बोलत असतांना वीज कोसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्या सर्वांच्या कानी सुद्धा पडल्या आहेत. मोबाईलवर बोलतांना तरंग लहरीकडे आकर्षित होऊन वीज कोसळते. त्यामुळे, 'आपण प्रयोगाचा उंदीर' ठरणार नाही. याची दक्षता घेत मोबाईलवर बोलणे टाळावे.

विजेद्वारे मिळते धोक्याची घंटा
वीज चमकतांना विद्युत प्रभार जाणवतो. अंगावर शहारे येऊन केस उभे राहतात. त्वचेला झिणझिण्या आल्यासारख्या वाटते. वरील यासर्व बाबींमधून धोक्याच्या घंटेचा एकप्रकारे संकेत मिळतो. हे सर्व त्वरित लक्षात घ्यावे आणि सुरक्षित स्थळी उभे राहावे

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com