झेडपी सीईओंच्या आदेशाला ग्रामसेवकांकडून केराची टोपली, दीड महिन्यानंतर दिला पदभार

Akola News: Buldana ZP CEOs order was given a basket of bananas by Gramsevaks, a month and a half later
Akola News: Buldana ZP CEOs order was given a basket of bananas by Gramsevaks, a month and a half later

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा)  : तालुक्यातील किनगाव राजा ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी तब्बल दीड महिन्या नंतर ग्रामविकास अधिकारी रवींद्र काळुसे यांना पदभार दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. आता संबंधित ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कार्यवाही करणार काय ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.


किनगावराजा ग्रामपंचायत ही मोठी असल्यामुळे याठिकाणी ग्रामविकास हे पद आहे. परंतु, काही वर्षांपासून हे पद प्रभारावर होते. त्यामुळे गावचा विकास रखडला होता. त्यामुळेच तारीख 10 डिसेंबरला ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना पदभार दिला.

परंतु ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांच्याकडे दोन-तीन गावाच्या अतिरिक्त पदभार असल्यामुळे ग्रामसेवक हे गावात नियमित येत नसल्यामुळे नागरिकांना रहिवासी दाखला, गाव नमुना आठ यासह अनेक कागदपत्रांच्या कामासाठी सिंदखेड राजा किंवा ज्या ठिकाणी ग्रामसेवक आहेत.त्या ठिकाणी जाऊन कामे करावी लागत होती.

त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ग्रामपंचायतीचे पदे हे ग्रामविकास अधिकारी यांचे असल्यामुळे 10 ऑगस्टला जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी आदेश काढून रवींद्र काळुसे यांना किनगाव राजा गावाला नियुक्ती देण्यात आली. रवींद्र काळुसे हे अमडापूर ता.चिखली याठिकाणी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पहात होते. बदली झाल्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी चिखली यांनी रवींद्र काळुसे यांना 30 सप्टेंबरला कार्यमुक्त करण्यात आले.

त्यानंतर 1 ऑक्टोबरला गटविकास अधिकारी यांच्याकडे रुजू होण्यासाठी अर्ज दिला. समिती गटविकास अधिकारी यांना अर्ज देवून पदभार देण्याची विनंती केली. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी नियुक्ती आदेश काढून तत्काळ रुजू होण्याचे सांगितले. परंतु, ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी पदभार दिला नाही. ग्रामविकास अधिकारी रवींद्र काळुसे हे दीड महिन्यापासून दर दुसर्‍या दिवशी ग्रामपंचायतीच पदभार घेण्यासाठी जात होते,तरी सुद्धा ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी ग्रामपंचायतीला बोलावून सुद्धा पदभार दिला नाही.

वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र काळुसे यांना माघारी जावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी सिंदखेड राजा च्या आदेशाला ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी केराची टोपली दाखवली, तब्बल दीड महिन्यांनंतर तारीख 10 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत किनगाव राजा चा पदभार दिला ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी दिला. त्यामुळे गटविकास अधिकारी सिंदखेड राजा हे ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांच्यावर कार्यवाही करणार काय ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.


वेळेवर पदभार दिला नसल्यामुळे गौडबंगाल असण्याची शक्यता ?
ग्रामपंचायतीच प्रभारी पदभार असलेले आसाराम फुपाटे यांनी दोन महिन्यांनंतर पदभार रवींद्र काळुसे यांना दिला त्यामुळे प्रभारी ग्रामसेवकांच्या कालखंडात गौड बंगाल असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी पदभार दिला नसल्याची चर्चा आहे. त्यांच्या कालखंडातील विविध विकास झाले आहे त्यांची आकडेवारी कागदोपत्री जुळवाजुळव करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्यावर दबाव टाकून प्रभारी पदभार ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शेवटी ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांना पदभार द्यावा लागला असल्याची तालुक्याभर चर्चा आहे.

तीनही गावचा पदभार देण्यास विलंब
ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांच्याकडे दुसरबीड, सोयंदेव व किनगाव राजा गावाच्या पदभार होता. त्यानंतर याठिकाणी बदली होऊन तीन नवीन ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची नियुक्ती झाली. दुसरबीड येथे यु.आर. गायकवाड नियुक्ती आदेश 19 नोव्हेंबरचा आहे तरी सुद्धा त्यांच्याकडे 9 डिसेंबरला पदभार देण्यात आला. तर सोयंदेव येथे पी.ए. दानवे यांनी नियुक्ती आदेश 10 ऑगस्टला देण्यात आला तर पदभार 10 डिसेंबरला देण्यात आला त्यामुळे तीनही ग्रामपंचायतीचा पदभार देण्याची ग्रामसेवक आसाराम फुपाटे यांनी विलंब केला. त्यामुळे तीनही ग्रामपंचायतीच्या पदभार असताना गोड बंगाल असल्याची चर्चा जोराची सुरू आहे, त्यामुळे गटविकास अधिकारी हे त्यांच्यावर खरंच कार्यवाही करणार काय ? याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे

 किनगाव राजा ग्रामपंचायतीचा पदभार देण्यासाठी प्रशासकीय बाबीचा अडथळा असल्यामुळे ग्रामसेवक फुपाटे यांनी ग्रामपंचायतीचा पदभार देण्यासाठी उशीर झाला आहे.सद्या ग्रामविकास अधिकारी रवींद्र काळुसे यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे.
- एच.जी कांबळे, गटविकास अधिकारी, सिंदखेडराजा.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com