esakal | ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची टक्कर, कॉर्नर बैठका व मोर्चेबांधणीला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: clash in Gram Panchayat elections, corner meetings and front formation begins

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची मानल्या जाते. त्यात सरपंच पद मानाचे मानल्या जाते.

ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची टक्कर, कॉर्नर बैठका व मोर्चेबांधणीला सुरवात

sakal_logo
By
मो.मुश्ताक

चांडोळ (जि.बुलडाणा) : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेची मानल्या जाते. त्यात सरपंच पद मानाचे मानल्या जाते.

गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच पदाकडे बघितल्या जाते. यंदा सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तरी देखील ग्रामीण भागात निवडणुकीचे वेध लागल्याचे वातावरण सध्या पाहावयास मिळत आहे.

सरपंच पदाच्या आरक्षण सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने त्यासाठी आजी - माजी दिग्गजांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार आतापासूनच आपली फिल्डिंग लावण्यात व्यस्त असून मी पुन्हा येईल त्यानुसार मैदानात उतरणार आहे. तरुणांनी तर आपल्या गटातील सरपंच निवडून आले पाहिजे यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा लहान मोठ्या गावात रंगताना दिसत आहे.

गावाच्या विकासासाठी तरुणांचा कल स्थानिक निवडणुकीकडे आकर्षित झालेले दिसून येत आहे. बहुधा सरपंचाच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन बहुसंख्य पुढारी ग्रामपंचायतीत गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक घटनाही पाहावयास मिळतात. त्यामुळेच ग्रामीण भागातील सुज्ञ आणि सुशिक्षित तरुणांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा ग्रामीण भागात सुद्धा जोर धरू लागली आहे.

ग्रामीण भागात आता कॉर्नर बैठका तसेच कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचे भाकीत, तसेच वार्ड निहाय मतदार याद्या, स्थलांतरित मतदार, नातेवाईक, मित्रमंडळी, निवडून येण्यासाठी किती मते आवश्यक आहे. या बारीकसारीक बाबींचा सखोल अभ्यास करताना दिग्गज व्यस्त असल्याची चित्रे पाहावयास मिळत आहे. यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामीण भागात सुद्धा उमेदवारांमध्ये तसेच मोठ्या दिग्गजांत जोरदार काट्यांची टक्कर होणार यात तिळमात्र शंका नाही.

अन् सदस्यच निवडतील सरपंच
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत  महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर केले.त्यामुळे आता यापुढे सरपंचपदासाठी थेट निवडणूक न होता ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवडले जातील.त्यामुळे ज्यांचे जास्त सदस्य निवडून येतील त्यांना सरपंच पदाचा मान प्राप्त होईल हे मात्र निश्‍चित आहे.

खुल्या प्रवर्गाने वाढली चुरस
यंदा चांडोळ सरपंच पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग मधून संधी असल्याने.गावातील अनेकांना सरपंच पदाचे वेध लागले आहे.मित्र मंडळी सुद्धा अनेकांना भावी म्हणून हाक देत आहे.त्यामुळे यंदा जोरदार कट्याची टक्कर होणार हे मात्र निश्‍चित आहे.यात आता कोण बाजी मारेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.एक प्रकारे ग्रामीण भागात निवडणुकीच्या रणधुमाळीची चुरस निर्माण झाली आहे.

तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीवर महिलाराज
बुलडाणा तालुक्यातील 66 पैकी 33 पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे.यात राजकीय सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अनेक गावांचा समावेश आहे.तेथे महिलाराज आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image