
दिवाळीपूर्वी मंदावलेला कोरोना संसर्गाचा वेग आता पुन्हा वाढत असताना दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३७ पोहचली आहे.
अकोला : दिवाळीपूर्वी मंदावलेला कोरोना संसर्गाचा वेग आता पुन्हा वाढत असताना दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३७ पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आहे. दरम्यान कोरोना संसर्गाचे शुक्रवारी (ता. १८) जिल्ह्यात २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या सुद्धा १० हजार ७९ झाली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत शुक्रवारी (ता. १८) कोरोना संसर्ग तपासणीचे ५६८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह तर ५३९ अहवाल निगेटिव्ह आले. सकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील सहा, जुना राधाकिशन प्लॉट येथील तीन, खरप रोड व सोपीनाथ नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पारस, सिंधी कॅम्प, आदर्श कॉलनी, मलकापूर, मोठी उमरी, लहरिया नगर, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, उरळ ता. बाळापूर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील दोन, तर उर्वरित डाबकी रोड, स्वस्तिक सोसायटी, केशव नगर व न्यू तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. १४ जणांना डिस्चार्ज
कोरोनाची सद्यस्थिती (संपादन - विवेक मेतकर) |
|||