esakal | कोरोनाचे ४७ नवे पॉझिटिव्ह; ९ जणांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Corona's 47 new positives; 9 people discharged

 कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे शुक्रवारी (ता. ११) ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२५ झाली आहे. याव्यतिरीक्त कोरोनामुक्त झालेल्या ९ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोनाचे ४७ नवे पॉझिटिव्ह; ९ जणांना डिस्चार्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे शुक्रवारी (ता. ११) ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२५ झाली आहे. याव्यतिरीक्त कोरोनामुक्त झालेल्या ९ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे नागरिकांवर विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान शुक्रवारी (ता. ११) कोरोना संसर्ग तपासणीचे १ हजार ४६२ अहवाल प्राप्त झाले.

त्यापैकी १ हजार ४१५ अहवाल निगेटिव्ह तर ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त ९ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यात सूर्यचंद्र हॉस्पिटल येथुन एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोनाचे शुक्रवारी (ता. ११) ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर उर्वरित शिवाजी चौक, जठारपेठ, चिखलगाव, शिवानी, तुळजापूर ता. पातूर, जिएमसी हॉस्टेल, जुने शहर, खेडकर नगर, बार्शीटाकळी, सिटी कोतवाली, केडीया प्लॉट, कुबेर नगर, खेतान नगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व कापशी तलाव येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील चार जण स्वराज पेठ येथील, दोन जण कॉटन मार्केट अकोट, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण अकोट फैल, दोन जण गोरक्षण रोड तर उर्वरीत कळंबा बु. ता.बाळापूर, नानखेड, उदळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९८२४
- मृत - ३०१
- एकूण डिस्चार्ज - ८७९८
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७२५

(संपादन - विवेक मेतकर)