esakal | कोरोनाचे थैमान सुरूच, 90 नवे पॉझिटिव्ह, दोघांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Coronas 90 new positives, two deaths

कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २४) ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३६ अहवाल निगेटिव्ह, तर ९० अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ९२४ झाली आहे.

कोरोनाचे थैमान सुरूच, 90 नवे पॉझिटिव्ह, दोघांचा बळी

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. २४) ४२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३६ अहवाल निगेटिव्ह, तर ९० अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ९२४ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३६ हजार ९१० जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५ हजार ९६६, फेरतपासणीचे २०१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७४३ नमुने होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आजपर्यंत एकूण ३६ हजार २८० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ३० हजार ५७९ तर पॉझिटीव्ह अहवाल ६ हजार ९२४ आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान गुरुवारी मृत्यूमुखी पडलेल्या दोन जणपैकी एक मोरगाव उरळ येथील ५० वर्षीय महिला असून तिला २० सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला. अकोट येथील ७९ वर्षीय पुरुष असून ते २० सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. याव्यतिरीक्त सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ५६३ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.


या भागात आढळले नवे पॉझिटिव्ह
कोरोनाचे ९० अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये सिव्हील लाईन, खदान व मोरगाव भाकरे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच मूर्तिजापूर येथील ११, कुटासा व जीएमसी येथील प्रत्येकी ९, लर्डी हॉर्डींग जवळ येथील चार, कौलखेड, खदान, जठारपेठ, अकोट व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, अकोट फैल, मंडूरा, शात्री नगर, वानखडे नगर, गौरक्षण रोड, मोठी उमरी, रेणूका नगर, सिंधी कॅम्प व सिरसो येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, बायपास, लक्ष्मी नगर, चांदूर, डाबकी रोड, देवरावबाबा चाळ, बाळापूर, कान्हेरी गवळी, बोरगाव मंजू, कच्ची खोली, ‍शिवनी, खिरपूर, हिंगणा रोड, अंबिकी नगर, खडकी, बळीराम चौक, किनखेड, मोरगाव भाकरे, खोलेश्वर व दहिंहाडा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 
१९९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथून सात, युनिक हॉस्पीटल येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, आयुर्वेदीक महाविद्यालयातून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा १२५ जणांना अशा एकूण १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ६९२४
- मृत - २१७
- डिस्चार्ज - ५१४४
- ॲक्टिव्ह रुग्ण - १५६३

(संपादन - विवेक मेतकर)

loading image