आता बेरोजगारांना मिळेल नोकरी; खासगी कंपन्यांची दारे खुली

सुगत खाडे  
Monday, 21 September 2020

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक घटकांवर पहायला मिळत आहे. उद्योग, व्यापारांची गती मंदावली आहे. त्यानंतर सुद्धा अर्थचक्राला गती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे.

अकोला :  कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक घटकांवर पहायला मिळत आहे. उद्योग, व्यापारांची गती मंदावली आहे. त्यानंतर सुद्धा अर्थचक्राला गती देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारद्वारे करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्‍ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात या उद्देश्याने जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्‍वत वृद्धी व विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्‍यक आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील संधींचा फायदा घेण्यासाठी तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरूप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून केंद्र शासनातर्फे सन् २००९ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सुरुवात सन् २०१० पासून करण्यात आली आहे.

कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्‍यामध्‍ये नामांकीत खासगी उद्योजक, कंपनी, त्‍यांचे प्रतिनिधी एकूण २०० पेक्षा अधिक पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील. तसेच पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्‍या ऑनलाईन मुलाखती घेण्‍यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्‍यात येईल .

असा करता येईल अर्ज
- पात्र असलेल्‍या उमेदवार आपल्‍या शैक्षणिक पात्रतेच्‍या आधारे एका पेक्षा जास्‍त पदांकरिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- उमेदवार आपल्‍या सेवायोजन कार्डच्‍या यूझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन मधून ऑनलाईन अर्ज करावे.
- विभागाच्या संकेतस्‍थळावर नाव नोंदणी केलेल्‍या दहावी, बारावी, पदवी, नर्सिंग पदविका (एएनएम, जीएनएम), आयटीआय पास, पदविधर उमेदवारांना सेवायोजन कार्डच्या आयडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करता येईल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Unemployed will get jobs; The doors of private companies are open