नवी तलाई गावाचा दूर होणार अंधार, आमदार अमोल मिटकरी नवी तलाई गाव दत्तक घेणार

धीरज बजाज
Monday, 20 July 2020

"कधी होणार तलाई गावाची भलाई' मथळ्याखाली "सकाळ'ने अंधकारमय' तलाई गावाची व्यथा मांडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हिवरखेड (जि.अकोला)  ः तेल्हारा तालुक्‍यातील तलाई या पुनर्वसित गावाचा अंधकारमय लवकरच दूर होणार आहे. येत्या 22 जुलै रोजी आमदार अमोल मिटकरी हे गाव दत्तक घेणार असून, वीज जोडणीसह गावातील मूलभूत सुविधा देण्याचे काम सुरू होणार आहे.

विषेष म्हणजे,"कधी होणार तलाई गावाची भलाई' मथळ्याखाली "सकाळ'ने अंधकारमय' तलाई गावाची व्यथा मांडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

निसर्गाच्या सानिध्यात सातपुड्याच्या पायथ्याशी तेल्हारा तालुक्‍यातील हिवरखेड रेल्वे स्टेशन नजीक नवी तलई हे गाव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित आदिवासी बांधवांनी "नवी तलई' नावाचे गाव वसवले. गावाला महसूली दर्जा नाही, किंवा गावात कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. रस्ते, पाणी ,आरोग्य शिक्षण यासह गावातील सर्वात मोठी समस्यां म्हणजे व्या शतकातही गावामध्ये वीज पोहचलेली नाही.

अकोल्यात रेल्वे कोच फॅक्‍टरीसाठी 100 कोटीचा प्रस्ताव

नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. ग्रामस्थ आजूबाजूच्या गावात आपला मोबाईल चार्ज करून जगाच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करतात. आज सर्वत्र ऑनलाईन शाळेची चर्चा पाहायला मिळते, मात्र या गावात लाईनच नाही तर ऑनलाईन शाळा घरात कशी भरणार ? असा प्रश्न पडला आहे. ही बाब विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांना कळताच त्यांनी या गावाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या ध्यास घेतला.

कधी होणार तलाई गावाची भलाई? अजूनही गावात वीज नाही, अनेक मूलभूत सुविधांचा अभाव

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गावामध्ये सर्व मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी स्वीकारत गावाला अनेकदा भेटी दिल्यात. गावाच्या समस्यांबाबत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासित केल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महाबीजचे पत्र म्हणजे, स्वत:ची कातडी वाचविण्याचा प्रयत्न! : रविकांत तुपकर

तलाईची अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल
कायमचा अंधार असणाऱ्या नवी तलाई गावाचा अंधकार आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार अमोल मिटकरीच्या पुढाकाराने व महावितरणच्या सहकार्याने लवकरच दूर होणार आहे. गावात ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले असून, लोकांनी वीज कनेक्‍शन घेण्यासाठी अर्जही केले आहे. आता सर्व घरांमध्ये विद्युत पुरवठा पोहचणार असून, लवकरच गावमध्ये 'प्रकाशाची दिवाळी' साजरी होणार आहे.

 

(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news darkness of Navi Talai village will be removed, MLA Amol Mitkari will adopt Navi Talai village