esakal | मृत्यूसत्र सुरूच, आणखी दोघांचा बळी, 22 रुग्णांची भर; ॲक्टिव्ह रुग्ण 812 वर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Death toll continues, two more killed, 22 more injured; On Active Patient 812

कोरोना विषाणू कोविड-१९ च्या चाचणी अहवालांच्या संख्येसोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून, बुधवारी आणखी दोघांचा बळी गेला.

मृत्यूसत्र सुरूच, आणखी दोघांचा बळी, 22 रुग्णांची भर; ॲक्टिव्ह रुग्ण 812 वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना विषाणू कोविड-१९ च्या चाचणी अहवालांच्या संख्येसोबतच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून, बुधवारी आणखी दोघांचा बळी गेला.

दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे २०१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७९ अहवाल निगेटिव्ह तर २२ अहवाल पॉझिटीव्ह आलेत.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४० हजार ७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३९ हजार ७, फेरतपासणीचे २०८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७९२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३९ बदाप ७६२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३३ हजार ४८६ आहे तर पॉझिटिव्ह अहवाल ७७१३ आहेत. सद्यस्थितीत ८१२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत


आजचे २२ पॉझिटिव्ह
बुधवारी दिवसभरात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व पारध ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी, गजानन नगर, गांधीग्राम, वरूर जाऊळका ता.अकोट, आळेगाव ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, मलकापूर, कौलखेड, सिंदखेड, खडकी व वाडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


४४ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १९ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १२ जण, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, हॉटेल स्कायलार्क येथून १० जण, तर कोविड केअर सेंटर हेंडज मूर्तिजापूर येथून एक, अशा एकूण ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


दोन मयत
बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. त्यात कृषिनगर, सिव्हिल लाईन्स येथील ४३ वर्षीय महिला असून, ती ता. २४ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर दहीहंडा येथील ६५ वर्षीय पुरुष असून, तो ता.२६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४८ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७७१३
- मृत - २४८
- डिस्चार्ज - ६६५३
- ॲक्टिव्ह रुग्ण - ८१२

(संपादन - विवेक मेतकर)