
राज्य रंगभूमी प्रयोग परीनिरक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. अकोल्यातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. रमेश थोरात यांची राज्य शासनाने सलग तिसऱ्यांदाया मंडळावर नियुक्त केली आहे.
महाराष्ट्र हे रंगभूमी प्रयोग परीनिरक्षण मंडळ असलेलं देशातील एकमेव राज्य आहे.
अकोला : राज्य रंगभूमी प्रयोग परीनिरक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. अकोल्यातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. रमेश थोरात यांची राज्य शासनाने सलग तिसऱ्यांदाया मंडळावर नियुक्त केली आहे. रंगमंचिय कला सेंसार करूनच सादरिकरणाची परवानगी देण्यात येते. या मंडळाची शासनाने १६ डिसेंबर २०२० च्या आदेशाने पुनर्रचना केली आहे. पुनर्रचना करण्यात आलेल्या या २५ सदस्यीय मंडळात अकोल्यातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. रमेश थोरात यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सलग तिसऱ्यांला या मंडळावर नियुक्त केले आहे. ६० वर्षांचा थिएटरचा लेखन, दिग्दर्शन, अभिनय असा सर्वांग प्रदीर्घ अनुभव गाठीशी असल्यानेत्यांची तिसऱ्यांदाया मंडळावर नियुक्त झाली आहे. डॉ. थोरात यांनी भारतभर स्वलिखित पथनाट्यांचे १६ हजार ८७६ प्रोयग सादर करून जनजागृती व समाज प्रबोधन केले आहे. महाराष्ट्र व देश परदेशात त्यांच्या गाजलेल्या स्वलिखित ‘कचऱ्या हिंदुस्थानी’ या एकपात्रीचे २१७८ प्रयोग सादर झाले असून, हा एकपात्री प्रयोग ‘लिमका बूक ऑफ वर्ल्ड रेॅकॉर्ड’मध्ये लवकरच स्थान मिळणार आहे. (विवेक मेतकर) |
|||