esakal | श्रींचे मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, 10 वर्षांतील मुले, वृध्दांना प्रवेश नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Gajanan Maharaj Temple at Shegaon open for Darshan from today, children under 10 years, old people have no access

कोरानामुळे गत आठ महिन्याचे प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेशानंतर राज्यातील मंदिर उघडणार आहेत.त्याअनुशंगाने संतनगरीतून पुन्हा चला माऊली शब्द कानी पडणार आहेत.

श्रींचे मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, 10 वर्षांतील मुले, वृध्दांना प्रवेश नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा)  : कोरानामुळे गत आठ महिन्याचे प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेशानंतर राज्यातील मंदिर उघडणार आहेत.त्याअनुशंगाने संतनगरीतून पुन्हा चला माऊली शब्द कानी पडणार आहेत.

तर श्रींचे समाधी दर्शनाची भक्तांना ओढ लागली आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर देश लाॅकडाउन करण्यात आला.

त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. विदर्भ पंढरी शेगावातील श्री गजानन महाराज संस्थान चे मंदिरही बंद करण्यात आले. भाविकांची गर्दी सुध्दा थांबली. अनेक चार नंतर विविध राजकीय पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली आणि १४ नोव्हेंबर ला दिपावलीचे दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदिरे उघण्याचा निर्णय घेवून भाविकांना सुखद धक्का दिला.

त्यामुळे ‘पुन्हा गण गण गणात बोते’...चा गजर ...‘पुढे चला माऊली...’ हे शब्द कानी पडणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आठ महिन्यानंतर भाविकांची श्री संत गजानन महाराजांशी गाठ होणार आहे.मंदिर उघडण्याचे पार्श्वभूमीवर काल रात्री पासूनच मंदिर परिसरातीलविविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून, शेगावच्या थांबलेल्या अर्थ चक्राला गती येणार आहे.


भक्तांनी घ्यावयाची काळजी...
- श्री भक्तांना दर्शनाकरीता मास्क / दुपट्टा / गमछा असणे आवश्यक आहे,
- हार, फुले, प्रसाद, नारळ इत्यादी सोबत आणू नये,
- प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनिंग करून घ्यावी.
- पादत्राने स्वतःचे वाहनातच ठेवावीत किंवा ठरवून दिलेल्या रॅकवर स्वतःचे जबाबदारीवर ठेवावी.
- प्रवेश द्वाराजवळ हात सॅनिटाईज करून घ्यावेत.
- मूर्ती व ग्रंथांना स्पर्श करू नये.
- श्री मंदिरातील घंटांना स्पर्श करु नये किंवा वाजवू नये. स्वतःचे सुरक्षेकरिता मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप जतन करुन घ्यावी.
- प्रसाद, तीर्थ, विभूती घेण्याचा आग्रह करू नये.
- १० वर्षाच्या आतील व ६० वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांना श्रींचे दर्शनाकरिता प्रवेश शाशनाचे नियमानुसार देता येणार नाही.
- श्रींचे दर्शनाकरिता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करून घ्यावी. (त्याकरीता नेट कॅफे, सेतू, स्मार्ट फोन व स्थानिक बुथवर सुद्धा व्यवस्था उपलब्ध आहे.)
- दैनंदिन निश्चित केलेल्या संख्येनुसार भक्तांना श्रींचे दर्शनाकरिता प्रवेश दिल्या जाईल.
- श्रींचे दर्शनास जात असताना आजूबाजूला असलेल्या रॅलिंगला स्पर्श करू नये
- रेड झोन व कंटेन्मेंट झोन मधील भक्तांना शाशन निर्देशानुसार श्रींचे दर्शनाकरिता प्रवेश दिल्या जाणार नाही.


ई-पाससाठी भाविकांची लगबग
श्रींच्या मंदिरात ई-पास शिवाय प्रवेश नसल्याने आज सकाळपासूनच हजारो भक्तांनी मोबाईल, संगणकावरून ई-पास काढून घेतल्या.आठ महिन्यानंतर बंदोबस्तात असलेल्या मंदिरात पहिल्या दिवशीच श्रींचे दर्शन घेण्याची ओढ भक्तांमध्ये दिसून आली.

(संपादन - विवेक मेतकर)