esakal | शेकडो वर्षे वयाच्या झाडांची कत्तल होणार कत्तल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Hundreds of years old trees will be cut down

अकोला-मंगरुळपीर रोडच्या दोन्ही बाजुच्या शेकडो वर्षे वयाच्या जुन्या विविध प्रजातीच्या झाडांची कटाई सुरू असून, ही कत्तल थांबवावी व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी निसर्गप्रेमी शेख मोहम्मद शेख मकबूल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शेकडो वर्षे वयाच्या झाडांची कत्तल होणार कत्तल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः अकोला-मंगरुळपीर रोडच्या दोन्ही बाजुच्या शेकडो वर्षे वयाच्या जुन्या विविध प्रजातीच्या झाडांची कटाई सुरू असून, ही कत्तल थांबवावी व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा, अशी मागणी निसर्गप्रेमी शेख मोहम्मद शेख मकबूल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.


अकोला ते महान (मंगरुळपीर) रोडच्या बाजुने असलेले अंदाजे ३००० झाडे तोडण्याचे काम सुरू झालेले आहे.

रस्त्याच्या दूतर्फा असणारी ही कडूनिंब, चिंच, वड, पिंपळासह अन्य प्रजातीची झाडे शंभर ते सव्वाशे वर्षांहून अधिक वयाची असून ती तोडली जाणार आहेत. त्यामुळे पक्षी, पक्ष्यांची अंडी व पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे.

या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्यामुळे झाडे न तोडताही रस्त्याचे काम होऊ शकते. त्यामुळे ही जुनी झाडे कायम ठेवून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व हजारो झाडांची होणारी कत्तल थांबवावी, अशी मागणी निसर्गप्रेमी शेख मोहम्मद शेक मकबूल यांनी २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


अकोला मंगरूळपीर रस्त्याचे ६ मिटर डाबंरी रस्त्याच्या डबल लेअरचे काम अकोला शहरापर्यंत पुर्ण झाले असता रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेकडो वर्षे वयाच्या मोठमोठ्या झाडांची कटाई करणे चालू आहे. ही कत्तल थांबविण्याकरिता मी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तक्रार केली व जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून पर्यावरण वाचविण्यासाठी ही अनावश्यक वृक्षतोड करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाररास मनाई करावी म्हणून विनंती केली आहे.
- शेख मोहम्मद शेख मकबूल, निसर्गप्रेमी

loading image