कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाची झाडझडती

मनोज भिवगडे
Wednesday, 21 October 2020

महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाची नोंद करणे आवश्यक आहे. या नोंद वहिची मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी झाडाझडती घेतली.

अकोला  ः महानगरपालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाची नोंद करणे आवश्यक आहे. या नोंद वहिची मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी झाडाझडती घेतली.

याशिवाय कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पाचव्या दिवशीही कारवाई करण्यात आली. तब्बल ३९ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचा आदेश आयुक्तांनी दिला.

मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी मनपा मुख्‍य कार्यालयातील विविध विभागातील दैनंदिन कामकाजाची नोंद वहीची (वर्क रजिस्‍टर) तपासणी केली. सामान्‍य प्रशासन विभागाला मनपातील प्रत्‍येक विभागाची तपासणी करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. ज्‍या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत वर्क रजिस्‍टर तयार केलेले नाही त्‍यांचा अहवाल सादर करण्‍यास सांगतिले. यावेळी मनपा आयुक्‍त यांनी कार्यालयात उशिरा येणारे तसेच पुर्वपरवनगी न घेता गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार असून, कठोर कारवाई करण्याचा इशाराही देली आहे.

 

उत्तर झोनमध्ये सर्वाधिक लेटलतिफ
मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची मंगळवारी तपासणी करण्यात आली. त्‍यामध्‍ये एकूण ३९ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. सर्वाधिक लेटलतिफ हे उत्तर झोनमध्ये आढळले. विशेष म्हणजे, सलग पाचव्या दिवशी सर्वाधिक उशिरा येणारे कर्मचारी हे उत्तर झोनमध्येच आढळले.

 

विभागनिहाय असे आहेत लेटलतिफ
कोविड कक्ष- १, आरोग्‍य (स्‍वच्‍छता)-१, विद्युत विभाग-१२, माहिती अधिकार कक्ष-१, नगररचना विभाग-१, जलप्रदाय विभाग-२, पूर्व झोन-२, उत्‍तर झोन -१६, दक्षिण झोन -३

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Inspection of daily work of employees