esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीने शहरात लाखोंच्या अवैध गुटख्याचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Lakhs of illegal gutkha stocks in Risod in Washim district due to fear of second wave of corona

कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्याने सुमारे नऊ ते दहा महिन्यात सर्व व्यवसायांवर मंदीचे सावट पडल्यानंतरही अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय चढ्यादराने जोमात सुरू होता. दिवाळी आधी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील काही हाॅटेल व्यवसायीकांच्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले. परंतु महत्त्वाच्या गुटखा व्यवसायाविषयीच्या तपासणीला बगल दिली. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचा व्यवसाय जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीने शहरात लाखोंच्या अवैध गुटख्याचा साठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड (जि.वाशीम)  ः कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्याने सुमारे नऊ ते दहा महिन्यात सर्व व्यवसायांवर मंदीचे सावट पडल्यानंतरही अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय चढ्यादराने जोमात सुरू होता. दिवाळी आधी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील काही हाॅटेल व्यवसायीकांच्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले. परंतु महत्त्वाच्या गुटखा व्यवसायाविषयीच्या तपासणीला बगल दिली. त्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचा व्यवसाय जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत आहे.


रिसोड शहरातील सोनार गल्ली नजिक आता धोबी गल्लीमध्ये लाखोच्या अवैध गुटख्याची साठवणूक झाली असल्याची विश्वसनिय माहिती आहे. कारण शासनाने आता कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती दर्शविल्याने इतरांपेक्षा अवैध गुटखा विक्री व्यावसायिकांनी लाखोचा गुटख्या साठा शहरातील धोबी गल्ली मध्ये केल्याची विश्वसनीय माहिती आहे. दिवसाकाठी लाखोचा अवैध गुटखा व्यवहार चालतो.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

विशेष म्हणजे ‘कोणताच विभाग आमचे काहीच करू शकत नाही. कारण, महिण्याकाठी हजारोंची रक्कम या व्यवसायाचा हप्ता म्हणून दिली जाते’, आशा प्रकारची मुजोर भाषा सदर व्यवसाय करणारे खुले आम करतात. मागील काही वर्षामध्ये अनेकदा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापे पडले. परंतु प्रत्येक वेळेस अवैध गुटख्यातील मुख्य आरोपी संबंधित विभागाच्या हाती लागलाच नाही. अनेकदा गुटखा व्यवसायीक ऑन दि स्पाॅट पकडले.

हेही वाचा - धरणाचं पाणी पेटतंय, वानच्या पाण्याची पळवा-पळवी न थांबल्यास धरणावर आंदोलन

परंतु, एखाद्या कामाच्या शोधातील युवकांनाच संबंधित विभागाच्या गळाला लावीत त्यांच्यावर अवैध गुटखा विक्रीचे विविध कलमे लावीत त्यांना अटक करून मुख्य आरोपीला सोडल्याची चर्चा आहे. अवैध गुटखा व्यवसायामध्ये दिवसाकाठी लाखोंचे व्यवहार होत असल्याने अनेकांना हा व्यवसाय सुरू ठेवण्याची रसद घरपोच किंवा एखाद्या मध्यस्तीच्या मार्फत पुरविल्या जाते. हल्ली कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने लाखो रूपयांचा अवैध गुटखा चढ्या दराने विक्री करण्याच्या बेताणे शहरातील धोबी गल्लीतील एका घरामध्ये साठा करून ठेवल्याची विश्वसनिय माहिती आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

अन्न व औषध प्रशासन विभाग गायब
गुटखा व प्रतिबंधक तंबाखू यावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहेत. मात्र या विभागाच्या नाकावर टिच्चून हा अवैध गुटखा व्यवसाय सुखनैव नांदत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image