esakal | बिबट्या आला रे ऽऽऽ आला, दहिगाव शिवारात दहशत, शेतकरी धास्तावले
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Leopard came, terror in Dahigaon Shivara, farmers panicked

तालुक्यातील दहिगाव अवताडे शिवारात पांडुरंग गंगाळ यांच्या शेतात शिकार केलेले हरणाचा सांगाडा शुक्रवारी, ता.25 सप्टेंबर शुक्रवार रोजी आढळला. याठिकाणी बिबट आढळल्याने ही शिकार बिबट्याने केली असावी याचा शोध कोट व अकोला वनविभागाचे अधिकारी घेत आहे.

बिबट्या आला रे ऽऽऽ आला, दहिगाव शिवारात दहशत, शेतकरी धास्तावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) :  तालुक्यातील दहिगाव अवताडे शिवारात पांडुरंग गंगाळ यांच्या शेतात शिकार केलेले हरणाचा सांगाडा शुक्रवारी, ता.25 सप्टेंबर शुक्रवार रोजी आढळला. याठिकाणी बिबट आढळल्याने ही शिकार बिबट्याने केली असावी याचा शोध कोट व अकोला वनविभागाचे अधिकारी घेत आहे.


तालुक्यातील दहीगाव अवताडे परिसरातील दहिगाव फाट्यापासून अंदाजे पाचशे मीटर तेल्हाराच्या दिशेने तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे हे पेट्रोलिंग करून जात असताना ता. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान त्यांना रस्त्याच्या बाजूला शेतात एक बिबट्या आढळून आला होता.

या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला दिल्यानंतर ता. १९ सप्टेंबर रोजी कोट वनविभागाची चमूने परिसरात शोध मोहीम राबवली. त्यांना बिबट्याचे ठसे किंवा कुठलेच निशाण आढळून आले नाही.

शुक्रवारी दहीगाव शेतशिवारात पांडुरंग गंगाळ यांच्या शेतात शेतमजूर कामासाठी गेले असता त्यांना हरणाची शिकार केलेला सांगाडा आढळून आला. त्यांनी तेथून परत येऊन सदर घटनेची माहिती गावात दिल्यानंतर पोलिस पाटील अरविंद अवताडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व तेल्हारा पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना कळविले.

त्या अनुषंगाने अकोला व कोट येथील वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चमू दहिगाव शिवारात दाखल झाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top