विशिष्ट हेतूने देशातील मुस्लिम ‘टार्गेट’!- ॲड. बाळासाहेब आंबेडकर

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 27 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी संपूर्ण देशाला कोविड-१९च्या संकटात लोटले. संपूर्ण जगभरातील देश त्यांच्या सीमा बंद करीत असताना जानेवारीतच भारताच्या सीमा बंद झाल्या असता तर आज चित्र काही वेगळे राहीले, असते.

अकोला  ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी संपूर्ण देशाला कोविड-१९च्या संकटात लोटले. संपूर्ण जगभरातील देश त्यांच्या सीमा बंद करीत असताना जानेवारीतच भारताच्या सीमा बंद झाल्या असता तर आज चित्र काही वेगळे राहीले, असते.

हिंदूंना खुश करण्यासाठी देशातील मुस्मिलांना कोविड-१९ च्या आढून टार्गेट करण्यात आले असल्याचा आरोप ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोला येथे आयोजित धर्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यावर्षी कोरोनामुळे मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

या सभेला ॲड. बाळासाहेब आंबेडकर लॉनलाइन संबोधित करताना आंबेडकर यांनी हा आरोप केला. त्यांनी हे सरकार जेवढे लवकर घालवाल तेवढे या देशाच्या हिताचे असल्या म्हटले आहे. त्यांनी बिहार निवडणुकीच्या माध्यमातूनही मोदी सरकारवर टिका केली. 

संचालन प्रा.डॉ. एम.आर. इंगळे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या भाषणानंतर प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते ठामपणे उभे राहिल्याचे सांगितले. वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी कोरोना काळातही लढलेला एकमेव नेता बाळासाहेब असल्याचे ते म्हणाले. प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाट यांनी, महिला अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी महिलांना खंबीरपणे उभे करायला हवे, असे आवाहन समाजाला केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी, संपूर्ण भारत बुद्धमय करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी स्वतः बुद्धमय होण्याची प्रतिज्ञा करायला हवी, तरच संपूर्ण भारत बुद्धमय होईल, असे ते म्हणाले.

विजयादशमीलाच अर्थातच अशोक दशमीला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. सम्राट अशोकाशी नाते जोडण्याच्या विचाराने डॉ. बाबासाहेबांना १९५६ ला विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यामुळे या दिवशीच हा सोहळा आयोजित केला जात असल्याचे वानखडे यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी नाही तर संपूर्ण देशाचे कैवारी हे समजून घेतले तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजू शकेल, असे वानखडे यांनी सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Muslim targets in the country for a specific purpose! - Adv. Balasaheb Ambedkar