आता विवाहासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही!

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 19 December 2020

 कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने ता. २२ जून रोजी लग्न समारंभ आयोजनाकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमांसाठी आयोजकांना परवानगी घ्यावी लागत होती. परंतु आता लग्न व तत्सम कार्यक्रमांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे परिपत्रक अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (महसूल) डॉ. नीलेश अपार यांनी जारी केले आहेत. त्यामुळे नागरिकांची आता लग्न परवानगीसाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यापासून सुटका झाली आहे.

अकोला  :  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने ता. २२ जून रोजी लग्न समारंभ आयोजनाकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमांसाठी आयोजकांना परवानगी घ्यावी लागत होती.

परंतु आता लग्न व तत्सम कार्यक्रमांसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे परिपत्रक अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (महसूल) डॉ. नीलेश अपार यांनी जारी केले आहेत. त्यामुळे नागरिकांची आता लग्न परवानगीसाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यापासून सुटका झाली आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत ५० लोकांना (व्यक्ती) लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रमांसाठी राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. लग्नासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बॅंड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे.

कार्यक्रमस्थळी कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यात यावा, असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

परंतु त्यानंतर सुद्धा सदर नियमांचे पालन होत नसल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ अन्वये व भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षेसाठी पात्र असलेला गुन्हा केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: No separate permission required for marriage now!