esakal | आरक्षण बचावसाठी ओबीसी रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: OBC on the road to save the reservation

 मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावाची भूमिका घेत जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले. विविध संघटनांच्या सहभाग असलेला ओबीसींचा मोर्चा बुधवार, ता.२ डिसेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांनी पुढाकार घेतला.

आरक्षण बचावसाठी ओबीसी रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकाेला : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावाची भूमिका घेत जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले. विविध संघटनांच्या सहभाग असलेला ओबीसींचा मोर्चा बुधवार, ता.२ डिसेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांनी पुढाकार घेतला.


ओबीसी आरक्षणावर भविष्यात येणारे गंडातर लक्षात घेता ओबीसी समुदायाने वेळीच जागे हाेणे आवश्यक असल्याचे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.  


घोषणांनी दणानला परिसर
ओबीसी बचाव माेर्चात सहभागी झालेल्या महिला-पुरुष, युवक-युवतींनी आरक्षण बचावाबाबत दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानला होता. हाता फलक घेवून घोषणाबाजी करीत मोर्चाला बस स्थानकापुढील स्वराज्य भवनातून सुरुवात झाली. ‘उठ ओबीसी जागा हाे, आरक्षणाचा धागा हाे’, ‘ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’, ‘आरक्षणाच्या हक्का खातर ओबीसी उरतली रस्त्यावर’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ आदी घोषणा व हाता फलक घेवून हजारो ओबीसी महिली व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.


या मागण्यांकडे वेधले लक्ष
-ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या तज्ज्ञ वकिलांची नियुक्त करावी. - ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावे.
- ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
- उच्च शिक्षणाकरिता २७ टक्के आरक्षण देण्यात यावे.
- इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी.
- राज्य व केंद्र सरकारच्या नोकर भरतीमध्ये प्रवर्गनिहाय २७ टक्के अधिकारी, कर्मचारी नेमावेत.
-ओबीसींचा अनुशेष पूर्ण करण्यात यावा.
- तालुका व जिल्हास्तरावर विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभाण्यात यावे.
- नॉनक्रिमीलेअरची अट शिथिल करण्यात यावी.
- ओबीसी आरक्षणाची अंमलबाजवणी काटेकोर व्हावी.


जिल्हाभरातील संघटनांचा सहभाग
ओबीसी आरक्षण बचाव माेर्चात बारा बलुतेदार संघ, कुणबी विकास मंडळ, भावसार समाज, माळी युवा संघटन, कुंभार महासंघ, परीट महासंघ, कोळी संघटना, खोरीप, जय मल्हार सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रा. तुकाराम बिडकर यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर मोजक्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसींच्या मागण्यांसंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image