
हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेवून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत व नातेवाईकांकडे सोपविण्यासाठी पोलिसांतर्फे ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. महिनाभर हे अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले आहे.
अकोला : हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेवून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत व नातेवाईकांकडे सोपविण्यासाठी पोलिसांतर्फे ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. महिनाभर हे अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले आहे.
विशेष पोलिस महानिरिक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग यांनी हरविलेल्या व सापडलेल्या बालकांच्या संदर्भात तसेच विशेष पोलिस महानिरिक्षक, (मबाअप्रवि) यांच्या निर्देशानुसार राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ ही शोध मोहीम राबविली जात आहे. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रासह अकोल्यातही ही पोलीस दलाकडून ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत बालकांसंबधी पो.स्टे हददीत (अशासकिय संस्था, धार्मिक स्थळे, रुग्नालय, हॉटेल, दुकान, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड) इत्यादी ठिकाणी काम करणारे किंवा भिक मागत असतांना मिळून आलेले मुल/मुली, तसेच हरविलेल्या महिला यांचा शोध घेतला जाणार आहे.
ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व पो.स्टे. वरून एक महिल व एक पुरुष पोलिस कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. ही मोहीम पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक शैलेष सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली व महिला पोलिस हवालदार अनिता टेकाम, पोलिस नाईक सुषमा घुगे व ऑपरेशन मुस्कान पथकातील कर्मचारी यांच्या मार्फत राबविली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडे जबाबदारी
स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडे ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांचे एक पथक गठीत करण्यात आले आहे. हे पथक हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेणार आहे.
आतापर्यंत १३ जणांचा घेतला शोध
बालकांना मुस्कान पथकातील कर्मचारी हे ताब्यात घेवुन सदर बालकाला जिल्हा बाल कल्यान समिती अकोला यांचे समक्ष हजर करून बाल कल्यान समितीच्या आदेशाने बाल निरीक्षण गृह, बालिका आश्रम यामध्ये दाखल करण्यात येते. ज्या मुलांचे पालकांचा शोध लागला त्यांना पालकांचे ताब्यात देण्यात येते. पहिल्या आठवड्यात वेगवेगळ्या पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल अपहरणातील ६ मुली व २ मुलांचा शोध घेवून त्यांना त्यांचे पालकाचे ताब्यात देण्यात आले आहे. हरविलेल्या ५ महिलांचा शोध घेण्यात आला. अशा एकूण १३ मुल/मुली व महिलांचा शोध घेण्यात आला.
(संपादन - विवेक मेतकर)