शितादही करण्यापुरताही पऱ्हाटीले कापूस नाही लागला

अनिल दंदी
Wednesday, 28 October 2020

शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली... कपाशीची झाडे वाढून मोठी झाली... मात्र बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने एकाही झाडाला बोंडेच लागली नाहीत, शितादही करण्यापुरताही पऱ्हाटीला कापूस लागला नसल्याचे शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बाळापूर (जि. अकोला)  : शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली... कपाशीची झाडे वाढून मोठी झाली... मात्र बियाणे निकृष्ट दर्जाची निघाल्याने एकाही झाडाला बोंडेच लागली नाहीत, शितादही करण्यापुरताही पऱ्हाटीला कापूस लागला नसल्याचे शेतकऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच

 शेतकऱ्याने पोलिस ठाणे गाठत बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या विरोधात तक्रार दिली आहे.

हा प्रकार घडला आहे बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे. तालुक्यातील अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण उर्फ बाबूराव राखोंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राखोंडे या शेतकऱ्याची अंदुरा शिवारात ३८३ गट क्रमांकाची चार एकर शेती असून शेतकऱ्याने चारही एकरात ६५९( बिजी २) तशेच मेघना (बिजी २) या वाणाची शेतात ता.७ जून रोजी पेरणी केली.

उन्हाळ्यात कोरोनाचा सामना करून कर्ज काढून व काबाडकष्ट करून बी-बियाणे खरेदी केले. मात्र, कापाशीला बोंडेच लागले नाही. शेतकऱ्याने तेल्हारा येथील भूमीपूत्र कृषी केंद्रातून कपाशीचे बियाणे खरेदी केले होते. त्याची पेरणी त्यांनी आपल्या शेतात केली होती. बियाणे खते टाकूनही बोंडे लागले नसल्याने वर्षभर करायचे काय,, असा प्रश्न पडला आहे.

संपूर्ण शेतकऱ्याचे कुटुंब शेतीच्या भरोशावर असून, आता करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. झालेले नुकसानाची भरपाई संबंधित कंपनीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चार महिना नंतरही या कपाशीला कापूस व कुठलाच माल न लागल्याने शेतकऱ्याने तेल्हारा कृषी केंद्राशी संपर्क साधला.

त्यांनी बियाणे कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बाबत वारंवार अवगत केले, मात्र सदर शेतकऱ्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शनिवारी ता. २४ रोजी उरळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन बियाणे कंपनी व कृषी केंद्राच्या संचालका विरुद्ध तक्रार दिली आहे.

शेकडो वर्षे वयाच्या झाडांची कत्तल होणार कत्तल

शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा
बियाणे कंपनी, कृषी केंद्र संचालक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही हाती काहीच लागले नसल्याने अखेर शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा उरळ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. सदर शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, आपल्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Parhati did not have enough cotton to make shitadahi