esakal | पोलिसांची दिवाळी आनंदात, मोर्चे, निदर्शनांना बसला चाप
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Police celebrate Diwali, rallies, demonstrations

दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती.

पोलिसांची दिवाळी आनंदात, मोर्चे, निदर्शनांना बसला चाप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

रिसोड (जि.वाशीम) :  दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती..

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. ना मोर्चे, ना आंदोलने, यात्रा उत्सवही बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना आपल्या घरात कुटुंबीयांसोबत आनंदात दिवाळी साजरा करता येणार आहे.

राज्यात मागील मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू होते. सर्व सामान्य नागरिक , नोकरदार, व्यापारी, व्यावसायिकांना सक्तीने घरात थांबावे लागले. या काळात मात्र कायदा व सुव्यवस्थाची जबाबदारी पार पाडताना पोलिसांचे काम वाढले होते. कोरोनाच्या काळात आपला जीव मुठीत धरून पोलिसांना बंदोबस्त करावा लागला.

मुसळधार पावसातही पोलिस दादा रस्त्यावर होता. नाकाबंदी काळात बाहेरच्या जिल्ह्यातून एकही व्यक्ती प्रवेश करणार नाही याकडे कटक्षाने त्यांना लक्ष द्यावे लागले होते. सात ते आठ महिने पोलिस आहोरात्र राबल्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी हातभार लागला.

आता ऑनलॉकची परिस्थिती असली तरी अजूनही लोकांच्या मनातील कोरोनाची धास्ती गेली नाही. प्रशासनाने सुध्दा फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिल्याने सध्या मोर्चे, आंदोलन, धरणे व सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. कापूस दरवाढ, कामगारांचे प्रश्न अथावा इतर कोणतेच मोठे आंदोलन तोंडावर नाही.

त्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काहीसा कमी झाला आहे. कोरोनाचे संकट असल्याने यावेळी यात्रोत्सव रद्द झाल्या आहेत. विजयदशमी ते दिवाळीपर्यंतचे सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण पडणार नाही. सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी कुटुंबासोबत साजरी करण्यास संधी आहे.


बदल्यांमधूनही मिळाले समाधान
कोरोना बंदोबस्तातून पोलिस कर्मचारी आता मुक्त झाले आहेत. त्यामुळे पोलिस विभाग टेंशनमुक्त आहे. मधल्या काळात पोलिस विभागात बदल्यांचे सत्र सुरू होते. यावेळी प्रथमच कर्मचाऱ्यांच्या मनासारख्या बदल्या झाल्या. अनेकांच्या बदल्या हव्या त्या ठिकाणी झाल्या. त्यातच दिवाळी कुटुंबासोबत साजरी करायला मिळणार असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)