esakal | वातावरणातील बदलामुळे कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Bondali attacks on cotton due to climate change!

परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे तूर पीक धोक्‍यात आले आहे.

वातावरणातील बदलामुळे कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

चतारी (जि.अकोला) ः परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. वातावरणातील बदलामुळे तूर पीक धोक्‍यात आले आहे.

सध्या पातूर तालुक्यातील खेट्री, पिंपळखुटा, शिरपूर, चतारी, चांगेफळ, चान्नी, उमरा, पांगरा, मळसुर, सावरगाव, आडगाव, राहेर, या परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, कपाशी पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. परंतु पातूर तालुक्याचे कृषी विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

गत चार-पाच वर्षांपासून पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या विविध पिकांच्या उत्पादनामध्ये ७० टक्‍क्‍याने घट झाल्यामुळे बहुसंख्य शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे. यावर्षी सुरूवातीपासून समाधानकारक पाऊस पडला होता. तेव्हा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पिकांची परिस्थिती ही चांगली असल्याने व सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमध्ये वाढ झाली आहे. चार-पाच वर्षांपासून विविध पिकांवर लावण्यात आलेले खर्चही निघाले नाही. यावर्षी सुद्धा परतीच्या पावसामुळे विविध पिकावर लावण्यात आलेला खर्च ही निघणे कठीण झाले आहे. बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


कृषी मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज
परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, ज्वारी पीक शेतकऱ्यांचे हातातून गेले आहे. परंतु बोंडअळीच्या व पोखरणाऱ्या अळीच्या आक्रमणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे.


परतीच्या पावसामुळे आधीच मूग, उडीद, ज्वारी पीक हातातून गेले. आता गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.
- धनंजय बादरखे, शेतकरी, चतारी

(संपादन - विवेक मेतकर)

loading image