esakal | महिलांना मिळणार शिलाई मशीन, पिको फॉल मशीन व लेडीज सायकल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Selection of beneficiaries of three schemes for women and child welfare

 जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिलाई मशीन, पिको फॉल मशीन व लेडीज सायकल वाटप योजनांच्या लाभार्थ्यांची निवड शुक्रवारी (ता. ११) महिला व बाल कल्याण समितीच्या ऑनलाईन सभेत करण्यात आली.

महिलांना मिळणार शिलाई मशीन, पिको फॉल मशीन व लेडीज सायकल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिलाई मशीन, पिको फॉल मशीन व लेडीज सायकल वाटप योजनांच्या लाभार्थ्यांची निवड शुक्रवारी (ता. ११) महिला व बाल कल्याण समितीच्या ऑनलाईन सभेत करण्यात आली.

यावेळी सदर योजनांसाठी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने संबंधित योजनांवर अतिरिक्त निधी वळती सुद्धा करण्यात आला. सदर तिन्ही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.


या आर्थिक वर्षात सुद्धा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यापैकी शिलाई मशीन; पिको फॉल मशीन व लेडीज सायकलचा लाभ मिळावा यासाठी अर्ज करणाऱ्या पात्र महिलांची निवड शुक्रवारी (ता. ११) महिला व बाल कल्याण समितीच्या ऑनलाईन सभेत करण्यात आली.

महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला गायत्री कांबे, योगिता रोकडे, रिजवाना परवीन शे. मुक्तार, मीनाक्षी उन्हाळे, लता नितोने, वंदना झळके, उर्मिला डाबेराव, अनुसया राऊत आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे पदसिद्ध सचिव तथा महिला व बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी कक्ष अधिकारी सुरेश चक्रनारायण, कनिष्ठ सहाय्यक पांडुरंग शहाकार व स्वीय सहाय्यक संतोष ताथोड, दुर्गा लोणाग्रे, सुनील गोपनारायण आदी उपस्थित होते.


प्रशिक्षणाच्या योजनांवरील निधी वळता
या आर्थिक वर्षात शिलाई मशीन व पिको फॉल वाटप योजनेसाठी लाभार्थ्यांकडून मोठ्‍या प्रमाणात अर्ज मिळाले आहेत. त्यामुळे समितीच्या सभेत प्रशिक्षण योजनांवरील १४ लाख रुपयांचा निधी शिलाई मशीन व पिको फॉल मशीन वाटप योजनेवर वळती करण्यात आला. त्यापैकी शिलाई मशीन वाटप योजनेवर १३ लाख ५० हजार तर पिको फॉल मशीन वाटप योजनेवर १ लाख ७३ हजार रुपयांचा निधी वळती करण्यात आला.


इतर विषयांवर चर्चा
- सभेत अंगणवाडी सेविक व मदतनिस यांच्या रिक्त जागी पदभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यासाठी शासन स्तरावरुन पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सभेचे सचिव विलास मरसाळे यांनी दिली.
- ८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिन असल्याने सदर दिवशी आदर्श मुख्य अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा सत्कार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
- महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यावर सभेत चर्चा करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image