केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

Akola News: Sit-in agitation in front of Union Ministers house
Akola News: Sit-in agitation in front of Union Ministers house

बुलडाणा  ः वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांची सोयाबीन कपशी हातची गेली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दिवाळी पूर्वी कापूस खरेदी केंद्रे सुरू करून व्यापारी खेडा खरेदी करून व्यापाऱ्यांची लुट करीत आहेत.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारावी व पीक विम्याची शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या ११ नोव्हेंबर रोजी मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवाऱ्री (ता. ५) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


पत्रकार भवनात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी वाशिम जि.प.चे सदस्य दामु अण्णा इंगोले, बबनराव चेके, राणा चंद्रशेखर चंदन, डॉ. टाले, शाम अवथळे, शे . रफीक शे.करीम , अमोल राऊत आदी उपस्थित होते.


हे आंदोन दोन टप्यात असून पहिल्या टण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर तर दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील गडकरी वाड्यावर विदर्भातील शेतकरी ठिय्या देणार असल्याचे त्यांना सांगितले.

तुपकर म्हणाले की, यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाल्यान विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, मका ही खरीपाची पिके उज्वस्त झालीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले . मात्र शासनान केवळ दहा हजार कोटी रूपयाचे पॅकेज घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे जरी सरकार सांगत असले तरी या पॅकेजमधील अधांच निधी शेतकऱ्यांच्या वाट्यावर येणार आहे. हा मदन अत्यंत तोकडी आहे .

मदत द्यायचीच अमूल तर दोन हेक्टरच्या निकषाची शासनाने अट न घालता किमान २५ हजार रूपये सरसकट मदत द्यावी. कापसाचा ५७०० ते ५८०० रुपये हमी भाव आहे . मात्र व्यापारी अत्यंत कमी भावाने कापस खरेदी करीत असून क्विंटल नागे शेतकऱ्यांना एक ते दीड हजार रूपये तोटा होत आहे .

जर शासनाचे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले तर शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही. मात्र सरकार उशीरा खरदी केंद्र सुरू करते , तो पर्यंत शेतरी आपला कापूस व्यापार्‍यांना विकतात नंतर व्यापरी तोच कापूस सरकारला विकते. यामध्ये शेकरऱ्यांचे नव्हे तर व्यापाऱ्यांचे हीत जोपनल्या जात असल्याचा आरोपही तुपकारांनी केला. नुकतीच प्रशासनाने आणेवारी जाहीर केली

मात्र आणेवारी चुकीची असून इंग्रजकालीन आणेवारी पध्दत बंद करून सुधारीत वस्तुनिष्ठ आणेवारी काढण्याची मागणी त्यांनी केली . देशाचे पंतप्रधान म्हणातात हमी भावाने शेतकऱ्याचा माल खरेदी करा मग हमी भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार्‍या व्यापार्‍यावर सरकार का कारवाई करीत नाही असा सवालही तुपकर यानी उपस्थित करून केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांच्याच मुळावर उठणार आहे. विधेयक रद्द करावे किंवा त्यामध्ये सुधारणा करावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले . पश्चिम विदर्भातील आपण नुकताच दौरा केला. उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहोत . दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाची दिशा मराठवाड्यात जाहीर करणार असून, आंदोलन आक्रमक राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली .


एकही नेता विदर्भात फिरकला नाही
श्री.तुपकर म्हणाले की, परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाड्यासह खान्देशात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. मात्र नुकसानीची पाहणी करताना राज्यातील मंत्री फक्त पश्चिम माराष्ट्रातच फिरले त्याच भागातील नुकसानाची पाहणी मंत्र्यांनी केली. मोठा एकही नेता विदर्भात फिरकला नाही. केवळ विदर्भातील नेत्यांनीच दौरे केले दुजाभाव करणे योग्य नाही. जर जबाबदार मंत्री विदर्भात आले असते तर त्यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या झळा काळाल्या असत्या.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com