
सध्या पिकांच्या मशागतीला वेग आलेला असतानाच कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू आहे.
अकाेला ः सध्या पिकांच्या मशागतीला वेग आलेला असतानाच कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू आहे.
फवारणीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील १६२ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली असून दोघांचा बळी सुद्धा गेला आहे. याव्यतिरीत्क उपचाराअंती १५८ जण बरेही सुद्धा झाले आहेत. त्यामुळे आधीच अतिवृष्टी व नापिकीने हताश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता विषबाधेचा धोका अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे.
सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती. त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते. अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते
. सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील १६२ शेतकरी व शेतमजुरांना आतापर्यंत फवारणीतून विषबाधा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यासह दोन जणांचा मृत्यू सुद्धा फवारणीतून विषबाधेमुळे झाला आहे. याव्यतिरीत्क उपचाराअंती १५८ जण बरेही सुद्धा झाले आहेत.
प्रशासनाने राबविली होती मोहीम
कीटकनाशकातून विषबाधा होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेत जिल्ह्यात १६ ते २४ ऑगस्टदरम्यान शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यासह रथाद्वारे जनजागृती सुद्धा करण्यात आली. परंतु त्यानंतर सुद्धा फवासणीतून विषबाधेच्या होत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)