सुटी असल्यावरही भरता येईल टॅक्स

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 30 October 2020

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्‍ताधारकांसाठी थकित मालमत्‍ता करावर लागलेली शास्‍ती (व्‍याज) पूर्णपणे माफ करण्‍यात आली होती. त्‍याची मुदत ता.३१ ऑक्‍टोबर 2020 रोजी संपुष्‍टात येत आहे.

अकोला ः महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्‍ताधारकांसाठी थकित मालमत्‍ता करावर लागलेली शास्‍ती (व्‍याज) पूर्णपणे माफ करण्‍यात आली होती. त्‍याची मुदत ता.३१ ऑक्‍टोबर 2020 रोजी संपुष्‍टात येत आहे.

त्यापूर्वी ता. ३० ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलादुन्‍नबी असल्‍याने व ता. ३१ ऑक्टोबरला शनिवार असल्‍यामुळे कार्यालयास सुट्टी आहे; परंतू मालमत्ताधारकांची गैरसोय होऊ नये व थकित मालमत्‍ता कराचा भरणा करणे सोईचे व्‍हावे, शास्‍ती अभय योजनेचा लाभ मिळावा याकरिता मालमत्‍ता कर वसुली विभाग आणि चारही झोन कार्यालये कराचा भरणा करण्‍यासाठी सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

उशिरा येणाऱ्या २४ मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई
 गुरुवारी सकाळी मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी केली असता त्‍यामध्‍ये एकूण २४ कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्‍याचे आढळून आले.

त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्‍य (स्‍वच्‍छता)१, सामान्‍या प्रशासन विभाग २, कर वसुली विभाग १, जलप्रदाय विभाग १, भांडार विभाग १, वैद्यकीय आरोग्‍य विभाग १, समग्र शिक्षा अभियान कार्यालयातील १, मलेरिया विभाग ८, किसनीबाई भरतीया रुग्‍णालय १, नगररचना विभागातील १, उत्‍तर झोन कर विभाग ५ आणि उत्‍तरझोन कर विभागातील १ असे एकूण २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Tax payment facility from the Corporation