esakal | नऊ लाखांचा ठेका, तरी ५० रुपयांची मागणी!, पालिकेचा अजब कारभार; कचऱ्यात कोण करत आहे स्वतःचा कचरा ?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Telhara Municipalitys strange management, money is boiled in the name of cleanliness

गेले चार वर्षांपूर्वी तेल्हारा शहरातील कचरा उचलण्यासाठी महिन्याला एक लाख रुपयांच्या आत खर्च येत होता. आता भाजपची सत्ता असलेल्या तेल्हारा नगर परिषदमध्ये त्याच कचरा संकलनासाठी महिन्याला नऊ लाख रुपयांच्या जवळपास खर्च येत आहे. तसा ठेका पालिकेने ठेकेदाराला दिला आहे.

नऊ लाखांचा ठेका, तरी ५० रुपयांची मागणी!, पालिकेचा अजब कारभार; कचऱ्यात कोण करत आहे स्वतःचा कचरा ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) : गेले चार वर्षांपूर्वी तेल्हारा शहरातील कचरा उचलण्यासाठी महिन्याला एक लाख रुपयांच्या आत खर्च येत होता. आता भाजपची सत्ता असलेल्या तेल्हारा नगर परिषदमध्ये त्याच कचरा संकलनासाठी महिन्याला नऊ लाख रुपयांच्या जवळपास खर्च येत आहे. तसा ठेका पालिकेने ठेकेदाराला दिला आहे.

एवढी मोठी रक्कम पालिकेच्या तिजोरितून खर्च होत असताना सुद्धा नागरिकांनकडून घरा समोरील कचरा उचलन्याकरिता ५० रुपयांची मागणी होत असल्यामुळे पालिकेने सर्वच हद्द पार केल्याचे चित्र दिसून येत आहे. कचऱ्यात सुद्धा कोण करीत आहे स्वतःचा कचरा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी


तेल्हारा नगर परिषदमध्ये गेल्या चार वर्षांच्या कालावधीत नवनवीन किस्से समोर येत आहेत. यापूर्वी नगर परिषदच्या इतिहासामध्ये जे जे घडल नाही ते ते पाहावयास मिळत आहे. ‘ना ठेका, ना ठेकेदार’, ‘ना खाएंगे`, ना खाने देंगे’ म्हणत सत्ता प्राप्त करणारे पारदर्शक कारभाराचे आश्वासन भुलल्याचे अनेक कारणांवरून स्पष्ट होते. तेल्हारा नगर परिषदेमध्ये चार वर्षांपूर्वी महिन्याला एक लाख रूपयांच्या आत ठेकेदाराला ठेका दिला जात असे; परंतु आता महिन्याला कचरा उचलन्याचा ठेका हा नऊ लाख रुपयांपर्यंत दिला गेला आहे.

हेही वाचा - अलास्का, युरोप, अफ्रिकेमधुन आले विदेशी पाहुणे

त्यामुळे कचरा उचलण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात मजूर व गाड्यांची संख्या हवी, परंतु तसे दिसून येत नाही. वेळेवर कचरा उचलल्या जात नाही. सर्वत्र घानीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित कचऱ्याचे ढिग उचलल्या जात नाहीत, अशा तक्रारी बहुतांश भागातून येत आहेत. कचरा उचलण्याकरिता जे मजूर काम करीत आहेत, त्यापैकी काही मजूर हे घरासमोरील कचरा उचलण्याकरिता पैशांची मागणी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - चला चला गर्दी करा, निवडणूकीसाठी अर्ज भरा! शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी तुंबळ गर्दी

‘कमिशन बाजी’ची सर्वत्र चर्चा
कचऱ्याच्या ठेक्या संदर्भात यापूर्वी अनियमितता व गैरप्रकाराबाबत तक्रार करण्यात आल्याचे समजते. सदर निविदाही काढताना कुठेतरी मॅनेज करण्याच्या हिशोबाने काढण्यात आल्याचे आरोप होत आहेत. या कचऱ्याच्या ठेक्या मध्ये काहीजण स्वतःचा कचरा करून घेत असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे. ‘कमिशन बाजी’च्या केमिकल लोच्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

चौकशी समिती नियुक्त करून भ्रष्टाचाराचे आरोप पालिका फेटाळणार का?
तेल्हारा नगर परिषदेच्या अनेक विकास कामांबाबत भ्रष्टाचाराचे खुलेआम आरोप करण्यात येत आहे. निविदांमध्ये सुद्धा घोळ झाल्याचे आरोप होत असून, सदर आरोप सिद्ध करण्याचे सुद्धा तयारी तक्रारकर्त्यानी दाखविली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार व गैरप्रकाराच्या आरोपाबाबत नगरपालिका जर का पारदर्शक कारभार चालवत असेल तर होत असलेले आरोप फेटाळण्याकरिता चौकशी समिती नेमणार काय, याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image