esakal | बारा गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी केल्या हद्दपार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Twelve criminal gangs banished for two years

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुंड व गुन्हेगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

बारा गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी केल्या हद्दपार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुंड व गुन्हेगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.


जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांवर पोलिस अधीक्षकांनी विशेष वॉच ठेवला होता.त्यांच्या गुन्ह्यांची कुंडली तयार करण्याचे काम सुरू होते. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळी व गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

याच कारवाईचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कला ५५ नुसार कारवाई करीत मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दतील दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेस पोलिस अधीक्षकांनी १ ऑक्टोबर रोजी दिला.

त्यात संजय व्यंकट गुंजाळ (४२), सुनील रामा गुंजाळ (३९, रा. वडरपुरा) या गुन्हेगारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १२ गुन्हेकारी टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळ्यांमधील एकूण ३० गुंडांना दोन वर्षांसाठी अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)