esakal | दोन दुचाकींची समोरासमोर धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Two bikes collided head on

दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होवून त्यात तीनजण गंभीर जखमी झाल्याची व अपघातातील एक दुचाकी जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.२६) दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद धुर्तगती मार्गावरील कृष्णा कृषी बाजारसमोर घडली.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

कारंजा (जि.वाशीम)  ः दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होवून त्यात तीनजण गंभीर जखमी झाल्याची व अपघातातील एक दुचाकी जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.२६) दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर औरंगाबाद धुर्तगती मार्गावरील कृष्णा कृषी बाजारसमोर घडली.

प्राप्त माहितीनुसार एम.एच. ३७ एम ३०७२ क्रमांकाची दुचाकी कारंजाहून शेलुबाजारकडे जात असताना मार्गातील कृष्णा कृषिबाजार समोर सदर दुचाकीला विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली.

यात कोमल संजय राठोड वय ३५ वर्ष रा.अशोक नगर कारंजा, महेश सुरेश सुर्वे वय १८ वर्ष रा. इचा ता. मंगरूळपीर, शिवा इंद्रसिंग राठोड वय २२ वर्ष रा. शेवती, असे तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातात एक दुचाकी जागीच जळून खाक झाली.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्यासह वाहतूक पोलिस अंकुश सोनार व युसूफ कालीवाले यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.

त्यानंतर कारंजा न.प.च्या अग्निशमन दलाच्या वाहनानेही घटनास्थळी हजेरी लावून दुचाकीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. आग विझविण्यासाठी चंदु खरडे, अहमद खाॅ समशेर खाॅ, भारत जोंधळे, अक्षय ढिके व सुरेश बनसोड यांनी प्रयत्न केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top