esakal | आणखी दोघांचा मृत्यू; 29 अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या घटली तरी धोका कायमच
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Two more die of corona; 29 report positive, the risk remains even if the number of patients decreases

जिल्ह्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या थोडी कमी होत असली तरी मृत्यूचे सत्र मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे २९ अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले, त्यासह दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.

आणखी दोघांचा मृत्यू; 29 अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या घटली तरी धोका कायमच

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला   ः जिल्ह्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या थोडी कमी होत असली तरी मृत्यूचे सत्र मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग तपासणीचे २९ अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले, त्यासह दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूने होणाऱ्या कोविड १९ रोगाने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान मंगळवारी (ता. ६) कोरोना संसर्ग तपासणीचे २५९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २३० अहवाल निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले.

यासह दोन रुग्णांचा बळी गेला. संबंधित रुग्णांपैकी एक रुग्ण बिर्ला रेल्वे कॉलनी, जठारपेठ येथील ९८ वर्षीय पुरुष होता. त्याला २९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू दहिगाव ता. तेल्हारा येथील ५० वर्षीय पुरुषचा झाला. त्याला ३ ऑक्टोम्बर रोजी दाखल करण्यात आले होते. संबंधित दोन रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या २४६ झाली आहे.


या भागात आढळला रुग्ण
कोरोना तपासणीच्या प्राप्त अहवालांपैकी सकाळी २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील पाच, अकोट व प्रसाद नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित राम नगर डाबकी रोड, बाळापूर नाका, आर्सद नगर, न्यू तापडिया नगर, शांती नगर, वानखडे नगर, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल, जाऊळका ता. अकोट, मलकापूर व दहिगाव ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व सात पुरुष आहे. त्यातील बाळापूर, केशव नगर, अकोट फाईल, सिंधी कॅम्प, कौलखेड, अकोट, डाबकी रोड व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.


४० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २६ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, अवघते हॉस्पिटल येथून तीन तर कोविड केअर सेंटर बार्शीटाकली येथून तीन जणांना, अशा एकूण ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


कोरोना मीटर
- एकूण पॉझिटिव्ह - ७६७८
- मृत - २४६
- डिस्चार्ज - ६६०९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ८२३

(संपादन - विवेक मेतकर)