पुन्हा दोन बळी; २२ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 17 October 2020

कोरोना संसर्ग तपासणीच्या अहवालात शुक्रवारी (ता. १६) २२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २६३ झाली आहे.

अकोला : कोरोना संसर्ग तपासणीच्या अहवालात शुक्रवारी (ता. १६) २२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याव्यतिरीक्त दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २६३ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. १६) १२१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२ अहवाल पॉझिटिव्ह तर ९९ अहवाल निगेटिव्ह आले. व्यतिरीक्त दोन रुग्णांचा बळी सुद्धा गेला. संबंधित रुग्ण उगवा, अकोट फैल येथील ६५ वर्षीय पुरुष होता. त्याला १४ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण शिवर, अकोला येथील महिला होती. तिला ९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉस्पीटल ओझोन येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर अवघते हॉस्पीटल येथून एक जणांना अशा एकूण १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

या भागात आढळले नवे रुग्ण
कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी सकाळी २१ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १३ महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शिवनी, सिंधी कॅम्प व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित खडकी, गोडबोले प्लॉट, जीएमसी हॉस्टेल, उमरी, जठारपेठ, विद्युत कॉलनी, व्दारका नगरी, संभाजी नगर, करोडी ता. अकोट, राऊतवाडी, मारोडा, जीएमसी, भीमनगर, उगावा व पैलपाडा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष असून तो जठारपेठ येथील रहिवासी आहे.

कोरोनाची स्थिती...
- एकूण पॉझिटिव्ह - ७९७१
- मृत - २६३
- डिस्चार्ज - ७३००
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४०८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Two more victims; 22 new positives