
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर विशेष पथकाने अवैध भांग केंद्रावर छापा टाकून दोन टन भांग जप्त केली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर लक्कड गंज परिसरात पथकाने ही कारवाई केली.
अकोला ः पोलिस अधीक्षक जी. श्रीधर विशेष पथकाने अवैध भांग केंद्रावर छापा टाकून दोन टन भांग जप्त केली. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर लक्कड गंज परिसरात पथकाने ही कारवाई केली.
मनोज बलोदे हा आपल्या घरीच मादक अमली प्रतिबंधक पदार्थ भांग घरात साठवून विक्री करीत होता. आरोपी मनोज रामहरक बलोदे याचे घरामध्ये ३५ पोते भांग आढळून आली.
विक्री करिता भिजविलेली सहा किलो भांग, कोरडी सुखी भांग २१३५ किलो अशी एकूण २१४१ किलो भांग जप्त करण्यात आली. ज्याचे मूल्य दोन लाख १३ हजार ५७५ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीकडून रोख ३७० रुपये जप्त करण्यात आले. विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने केली.
(संपादन - विवेक मेतकर)