
धार्मिक कार्यक्रमात कोविडच्या अटी शर्तीसह किमान १०० भाविकांच्या उपस्थितिला परवानगी द्यावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले होते.
अकोला : धार्मिक कार्यक्रमात कोविडच्या अटी शर्तीसह किमान १०० भाविकांच्या उपस्थितिला परवानगी द्यावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले होते.
वारकऱ्यांची ही मागणी आता मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर औचित्याचा मुद्दा उपस्थित करूण मांडळणार आहेत.
विश्व वारकरी सेना यांनी धार्मिक कार्यक्रमांना शासनाने अटी शर्ती लाऊन किमान १०० भाविकांच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्यात यावी याकरिता युवा विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यश्र गणेश महाराज शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालायासमोर बेमुदत उपोषण केले होते. जिल्हा प्रशासन व शासनाने कोणत्याही प्रकारची दाखल न घेतल्याने तब्बल आठ दिवस वारकऱ्यांना आंदोलन करावे लागले. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने उपोषणकर्ते वारकरी मंडळींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करता यावी, एवढीच किमान मागणी होती.
त्यानंतर आमदार सावरकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांचा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्रातील संतांनी उभारलेली सांप्रदायिक परंपरा ही सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ आहे. जीवनाच्या उद्धारासाठी तसेच अध्यात्मिक उन्नतीसाठी अशा परंपरा जपणे आवश्यक आहे.
राज्यात मात्र धार्मिक आणि सांप्रदायिक चळवळीची होत असलेली मुस्कटदाबी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक विकासाला नख लावणारी असल्याने आमदार रणधीर सावरकर यांनी चिंता व्यक्त केली. विश्व वारकरी सेनेच्या मागणीला तातडीने शासनाने मान्यता देऊन शासनाने धार्मिक व वारकरी परंपरेची जाणीव ठेऊन तातडीने मागणी मान्य करण्याची विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे. एवढेच नव्हे तर वारकऱ्यांचा आवाज ते विविधमंडळात सोमवार १४ डिसेंबर रोजी सुरू होत असलेल्या दोन दिवशीय अधिवेशनात उपस्थित करणार आहेत.
अधिवेशनातून न्याय मिळण्याची अपेक्षा
राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. या अधिवेशनात वारकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून राज शासन धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देईल, अशी अपेक्षा वारकऱ्यांतर्फे विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश
शेटे महाराज यांनी व्यक्त केली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)