वारे निवडणूकांचे; 225 ग्रामपंचयातीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 24 November 2020

राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

अकोला  ः राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ३४, अकोट तालुक्यातील ३८, मूर्तिजापूर तालुक्यातील २९, अकोला तालुक्यातील ३६, बाळापूर तालुक्यातील ३८, बार्शीटाकळी तालुक्यातील २७ तर पातूर तालुक्यातील २३ ग्रामपंचायती अशा एकूण २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी

त्यामुळे आता निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - प्रयोग फसला; 94 टक्के विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी ‘नो एन्ट्री’

१० डिसेंबरला प्रसिद्ध होणार अंतिम यादी
निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेप्रमाणे १ डिसेंबररोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर १ ते ७ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील, तर प्रभागनिहाय अंतिम यादी गुरुवारी (ता. १०) प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा २५ सप्टेंबर, २०२० राहिल.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Voter list program announced for 225 gram panchayats