esakal | विधानसभेच्या सर्व जागांवर वारकरी उमेदवार!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Warkari candidates for all Assembly seats!

  राज्यात भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणारे विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी अखेर आठव्या दिवशी उपोषणाची सांगता केली. मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिल्यावर आणि हा विषय येत्या अधिवेशानात मांडण्याचे आवश्यासन भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

विधानसभेच्या सर्व जागांवर वारकरी उमेदवार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  राज्यात भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणारे विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी अखेर आठव्या दिवशी उपोषणाची सांगता केली. मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिल्यावर आणि हा विषय येत्या अधिवेशानात मांडण्याचे आवश्यासन भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचवेळी शेट महाराज यांनी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास व वारकऱ्यांना कीर्तनाची परवानगी न मिळाल्यास पुढील विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर वारकरी संप्रादायातील उमेदवार उभे करून वारकऱ्यांची ताकद दाखवून देवू, असा इशाराही दिला.


विश्व वारकरी सेना, वारकरी साहित्य परिषद, वारकरी क्रांती सेना व वारकरी महामंडळ यांच्या पुढाकाराने विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी ता. २ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

धार्मिक कार्यक्रमासाठी १०० भाविकांना कोरोनाच्या संबंधी अटीव शर्त लावून परवानगी देण्यात यावी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपोषणकर्त्या वारकऱ्यांची समजूत घालून व त्यांचे म्हणणे शासनाकडे पोहोचविण्याचे आश्वासन देवूनही आंदोलन सुरू होते. अखेर बुधवारी आठव्या दिवशी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी उपोषण मंडपला भेट देवून वारकऱ्यांचा प्रश्न येत्या विधिमंडळ अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले.

सोबतच आमदार बाजोरिया यांनी वारकऱ्यांच्या मागणीनुसार चार दिवासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेटे महाराज यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जि.प. अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, माजी जि. प. अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, उपाध्यक्ष राठोड ,गजानन गवई, ह भ प महादेव निमकांडे महाराज, वासुदेव महाराज खोले, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, संदीपपाल महाराज, ह भ प गजानन महाराज दहिकर,गजानन महाराज हिरुळकर,रविंद्र महाराज केंद्रे,श्रीधर महाराज आवारे,तुलसीदास महाराज मसने, शिवा महाराज मावस्कर,राजू महाराज कोकाटे,विठ्ठल महाराज चौधरी,देविदास महाराज निखारे,विठ्ठल महाराज खापरकर, ज्ञानेश्वर महाराज, गजानन महाराज ऐरोकर, गजानन महाराज गावंडे, योगेश महाराज तांबडे, दिनेश महाराज भामदरे, सोपान महाराज काळूनसे, शिवहरी महाराज इस्तापे, गोवर्धन महाराज भाकरे, विठ्ठल महाराज महल्ले, आदींनी आज भेट दिली.


वारकऱ्याच्या हस्तेच सोडले उपोषण
गेले आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता दोन आमदारांच्या उपस्थितीत झाली. मात्र उपोषणकर्ते महाराज शेटेए यांनी उपोषण हभप लांडे महाराज यांच्या हस्ते रस घेऊन सोडवले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image