
जिल्हा परिषदेची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशी अर्थात रविवारी सुद्धा जिल्हा परिषदेत कामकाज सुरू होते.
अकोला ः जिल्हा परिषदेची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशी अर्थात रविवारी सुद्धा जिल्हा परिषदेत कामकाज सुरू होते.
सुटीच्या दिवशी कामकाज सुरू ठेवण्याबाबत प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकमत हाेत नव्हते. नंतर यातून मार्ग काढण्यात आल्यामुळे शनिवार नंतर रविवारी सुद्धा जिल्हा परिषदेचे पंचायत विभागासह इतर विभागात कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.
जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांची कामे प्रलंबित राहत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवण्याचा आदेश काढला हाेता.
लेखा आक्षेप, विभागीय आयुक्तांच्या निरीक्षण टिप्पणीतील अनुपालन १०० टक्के सादर करावयाचे असल्याने ७ व ८ नाेव्हेंबर (सुट्टीच्या दिवशी) राेजी कार्यालये सुरू ठेवण्यात यावे, असा उल्लेख असलेला आदेश शासनाकडून जारी करण्यात आला होता.
मात्र दिवाळीच्या पृष्ठभूमीवर सणाची तयारी करण्यासाठी वेळ नकाे का, शासनाने सुटी दिली असताना प्रशासनाने त्या रद्द करण्याचा घाट का घातला आहे, असे एक ना अनेक सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित करण्यात आले हाेते.
या ठिकाणी दिसली कर्मचाऱ्यांची उपस्थिती
सुटीच्या दिवशी रविवारी (ता. ८) जिल्हा परिषदेच्या काही विभागांमध्ये कामकाज सुरू हाेते. यात लघुसिंचन, बांधकाम, कृषि विभागाचा समावेश हाेता. जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू राहणार असल्याने कार्यालयाबाहेरील हाॅटेल्सही सुरू हाेते. त्यामुळे याठिकाणी राेजसारखीच गर्दी हाेती.
(संपादन - विवेक मेतकर)