आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

Akola Political News A case has been registered against 300 people including MLA Amol Mitkari
Akola Political News A case has been registered against 300 people including MLA Amol Mitkari

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुटासा गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी असे तीनशे जणांवर दहीहंडा पोलीस ठाण्यामध्ये काल सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या नियमांचे उल्लंघन त्याच पक्षातील आमदाराकडून होत असल्यामुळे इतरांनी का नियम पाळावे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने या संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन आधीच राज्यातील जनतेला केले. अकोला, अमरावती, नागपूर यासह इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक इतर जिल्ह्यात पेक्षा दुपटीने वाढत असल्याने या जिल्ह्यांमध्ये कडक कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आलेले आहेत.

त्यामुळेच राज्य सरकारने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभागी होऊ नये, या संदर्भात आदेश काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आधीच सांगितले होते.

या सरकारच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनीच कोरोना प्रतिबंधक नियम तोडण्यात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कुटासा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढली. सर्रासपणे राज्य सरकारच्या नियमांचे आदेशाचे तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या नियमांचे उल्लंघन आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. या संदर्भात दहीहंडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीनुसार आमदार अमोल मिटकरी व तीनशे ग्रामस्थांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितल्या जाते. 

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com