महानगरपालिकेची पोटनिवडणूक एप्रिल-मेमध्ये,  तीन जागांसाठी मतदार याद्यांची तयारी सुरू

Akola Political News Municipal Corporation by-elections in April-May, preparation of voter lists for three seats begins
Akola Political News Municipal Corporation by-elections in April-May, preparation of voter lists for three seats begins

अकोला : कोरोना संकट काळात अकोला शहरातील तीन नगरसेवकांना प्राणास मुकावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या तीन प्रभागातील पोटनिवडणूक एप्रिल-मेमध्ये होणार आहे. त्यादृष्टीने मतदार यादी निश्चित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला ता. २ फेब्रुवारी रोजी दिला.


अकोला महानगरपालिकेसह राज्यातील १६ मनपाच्या २५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. त्यानुसार एप्रिल-मे २०२१ मध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

त्यादृष्टीने मतदार यादी निश्चित करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. या पोटनिवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत अद्यावत असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.

त्यानुसार संबंधित प्रभागातील रिक्त जागांसाठी मतदार यादी तयार करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी ता. १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारुप मतदार यादीवर ता. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.

त्यानंतर ता. ३ मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ता. ८ मार्च २०२१ रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, ता. मार्च रोजी अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील.

हेही वाचा - शैक्षणिक शुल्काची पठाणी वसुली, शिक्षक विनापगार; शाळा बंद शुल्क सुरू

अकोल्यातील या तीन जागा आहेत रिक्त
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील तीन नगरसेवकांचे कोविड-१९ मुळे निधन झाल्याने तीन जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या जागांवर एप्रिल-मे २०२१ मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यात उमरी परिसरातील प्रभाग क्रमांक ४ ‘अ’, प्रभाग क्रमांक ३-'क’ व प्रभाग क्रमांक ८ ‘क’ या तीन जागांचा समावेश आहे.

हेही वाचा - सरपंचांची आरक्षण सोडत; 26 ओबीसी, 25 खुले, 28 एससी तर आठ एसटी प्रवर्गतील होणार गावकारभारी

यांच्या निधनामुळे झाल्या जागा रिक्त
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपचे नगरसेवक विजय शेगोकार यांचे ३ ऑगस्ट २०२० रोजी कोविड-१९ संसर्गामुळे निधन झाले होते. त्यानंतर प्रभाग ८ मधील भाजपचे नगरसेविका नंदा पाटील यांचेही कोविड-१९ संसर्गामुळे १ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले होते. प्रभाग क्रमांक ३ मधील भारिप-बमसंच्या नगरसेविका ॲड. धनश्री देव यांचे १३ नोव्हेंबर २०२० रोजी कोविड-१९ संसर्गाने निधन होते. त्यामुळे मनपा क्षेत्रातील तीन जागा रिक्त झाल्या होत्यात.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com