राज ठाकरेंचे प्रसिद्धीसाठी बेफाम आरोप -जयंतराव पाटील यांचा उलटवार; फडणवीस यांच्या वक्तव्यात गांभिर्य नाही

Akola Political News Raj Thackerays baseless allegations for publicity Jayantrao Patils reversal; Fadnaviss statement is not serious
Akola Political News Raj Thackerays baseless allegations for publicity Jayantrao Patils reversal; Fadnaviss statement is not serious
Updated on

अकोला : वीजबिल माफीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी अकोला येथे उत्तर देताना राज ठाकरे प्रसिद्धीसाठी असे बेफाम आराेप करीत असल्याचा उलटवार केला.

चिराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे फासे पलटण्याच्या विधानातही गांभीर्य नसल्याचे पाटील यांनी रविवारी अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा - गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी रविवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला.

राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात वीज बिल माफी संदर्भात आश्वासन दिल्यावर घुमजाव केले. याबाबत राज ठाकरे यांनी त्यासाठी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला हाेता.याबाबत विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे बेफाम वक्तव्य करीत असल्याचे म्हणले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाेन दिवसांपूर्वी सत्तांतरणाच्याअनुषंगाने फासे पलटण्याचे विधान केले हाेते.

यावर फडणवीस यांना मी गांभीर्याने घेत असलाे तरी त्यांच्या अशा विधानांना मात्र गांभीर्याने घेत नाही, असा टाेला पाटील यांनी लगावाला.


जलयुक्त शिवार याेजनेच्या कामांच्या चौकशीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, कामे सुमार दर्जाची झाल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यामुळे चाैकशी सुरू झाली. ही कामे दर्जेदार व्हावीत या अपेक्षेने ही चौकशी होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, आमदार नितीन देशमुखही उपस्थित हाेते.

हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?

शाळा शुल्कबाबत मध्यममार्ग काढा
टाळेबंदीमुळे सामान्यांसह खासगी शिक्षण संस्थाही अडचणीत आल्या आहेत. दोघांचाही विचार करता शाळा शुल्क माफीबाबत मध्यमार्ग काढणे आवश्यक असल्याचे जससंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

विधानसभा अध्यक्षाबाबत चर्चा करून निर्णय
काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविल्याने नाना पटाेले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्या. त्यामुळे आता महािवकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करून निर्णय घेतली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

इंधन दरवाडीबाबत भाजप नेत्यांनी केंद्राला विचारावे
युपीए सरकारच्या काळात इंधन दर थाेडेही वाढले की भाजप नेते आंदाेनलासाठी रस्त्यावर उतरत असत. आता भाजपचे सरकार असून, केंद्राने इंधनाचे दर वाढल्यास त्या टक्केवारीनुसार राज्यातील कराचे दरही वाढतात. त्यामुळे केंद्रानेच दर कमी करावेत. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याऐवजी केंद्र सरकाराला सांगावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com