esakal | अकोला जिल्ह्यात हाहाकार; ढगफुटी सदृश्य पाऊस, गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला जिल्ह्यात हाहाकार; ढगफुटी सदृश्य पाऊस, संपर्क तुटला

अकोला जिल्ह्यात हाहाकार; ढगफुटी सदृश्य पाऊस, संपर्क तुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : तब्बल दीड महिन्यानंतर बुधवारी मध्य रात्री रौद्ररूप घेणाऱ्या पावसाने अकोला शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला. रात्री १ ते ३ वाजेपर्यंत अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके खरडून केली. मध्य रात्रीपासूनच मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काढावरील घरांमध्ये पाणी शिरले. बार्शीटाकळी तालुक्यात आळंदा येथे निर्गुणा नदीला आलेल्या पुरात अनेक गुरे अडकल्याने मृत्यूमुखी पडले तर हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. मोर्णा नदीला आलेल्या पुराने शहरातून वाहून जाणारे पाणी साचल्याने अनेक घरात, कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये व बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. गुरुवारी दुपारपर्यंत अकोला शहराकडे येणारे अनेक रस्ते नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे बंद होते. (Akola-Rain-News-The-rains-cut-off-communication-between-the-villages-Flood-of-Morna-river-Crop-damage-nad86)

गुरुवारी सकाळी मोर्णा नदीचे पाणी दगडीपुलावरून वाहू लागले होते. अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील गावात पाणी शिरले. लगतची शेतशिवारा जलमय झाली तर शहरातील खडकी, कौलखेड, सिंधी कॅम्प, खदान, खोलेश्वर, कमलानगर, हरीहरपेठ, गुलजारपुरा, डाबकीरोड, गडंकी, नायगाव, भोळसह अनेक भागातील नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. घरातील सामान मोठ्या प्रमाणात नष्ट झाले.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

लोकांनी जीव वाचवन्यास्तव घरा बाहेर रात्र काढली. पुरात अडकलेल्या सुमारे पन्नास लोकांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. खडकी परिसर परिसरातील श्रद्धा नगर, सूर्या हाईट, स्मशानभूमी तसेच आरटीओ ऑफिसमागील ड्रिमलॅन्ड सिटी या परिसरात नदीचे पाणी घुसले होते. अनेक काॅम्प्लेक्सच्या बेसमेंट मधिल दुकाने पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. बेसमेटमधिल पाणी काढण्याचे काम सुरू झाले. परंतु रात्रभर पाणी साचल्याने दुकानातील वस्तू खराब झाल्या आहेत. बायपास वरील नवीन किराणा बाजाराला तर पाण्याने अशरश: वेढा घातला आहे.

शहरातील अनेक भागात साचले पाणी

अकोला शहरातील डाबकी रोड, जुने शहर, खरप रोड, न्यू तापडियानगर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, प्रसाद सोसायटी, गोयंका लेआउट, मुकुंदनगर रतनलाल प्लॉट आदी भागांमध्ये लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. शहरातील अनेक काॅम्प्लेक्सच्या बेसमेंट मधिल दुकानामधे पाणी साचल्याने व्यवसायीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

माहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

मध्य रात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे व्याळा ते रिधोरा दरम्यान महामार्गावर दोन फुट पाणी वाहत होते. यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कलाकत्ता ढाब्यात तीन फुट पाणी साचले. व्याळा गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

चार तालुक्यांना फसला फटका

अतिवृष्टीचा फटका अकोला शहरासह अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर तालुक्यातील बहुतांश भागाला बसला. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.

बॅरेजमधून पाण्याची विसर्ग

घुंगशी ब्यारेजची सर्वव्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत. रात्री तीन वाजता पूर्णा नदीला पूर आला. नेरधामणा बॅरेजचे दरवाजेही वर उचलण्यात आली. बार्शीटाकळी तालुक्यातील निर्गुणा व विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे मोर्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यातच दगडपारवा प्रकल्प तुटुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळेही मोर्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा: अंडे उबवून कृत्रिमरीत्या अजगराच्या चार पिल्लांचा जन्म

आमदार धावले मदतीला

मोर्णा नदीला महापूर आल्याने आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. खडकी, कौलखेड, सिंधी कॅम्प, खोलेश्वर,हरीहरपेठ, जुने शहर गडंकी आदी परिसरात आमदारांनी पाण्यात फिरून कार्यकर्त्यांसह नागरिकांची मदत केली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी फराळ, चहा, जेवणाची व्यवस्था केली होती. बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर आणि पातूर तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली व नागरिकांना मदत केली.

(Akola-Rain-News-The-rains-cut-off-communication-between-the-villages-Flood-of-Morna-river-Crop-damage-nad86)

loading image