esakal | Lockdown :संचारबंदीत शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस शाळेत घ्यावे की घरून घ्यावे?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim Corona News Lockdown: Should teachers with curfew take online classes at school or at home?

 कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली, मात्र त्यांच्या या आदेशाला शिक्षण विभागाकडून खो दिला जात असल्याची दर्शनास येत आहे. शिक्षण विभागातील सर्व घटक याबाबत संभ्रमात असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाचा आपापल्या सोयीने अर्थ लावत आहेत.

Lockdown :संचारबंदीत शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस शाळेत घ्यावे की घरून घ्यावे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

मालेगाव (जि.वाशीम) : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली, मात्र त्यांच्या या आदेशाला शिक्षण विभागाकडून खो दिला जात असल्याची दर्शनास येत आहे. शिक्षण विभागातील सर्व घटक याबाबत संभ्रमात असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाचा आपापल्या सोयीने अर्थ लावत आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व शाळा, कोचिंग क्लास बंद सांगण्यात आले आहेत. त्यामध्ये खासगी विद्यालय आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना येण्यास मनाई केली आहे, मात्र शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनाचे धडे कसे द्यावे? घरी राहून द्यावे की, शाळेत जाऊन द्यावे? याबाबत शिक्षक संभ्रमात आहेत. स्पष्ट आदेश नसल्याने कोणत्या शाळेतील शिक्षक घरूनच ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत, तर काही शिक्षक शाळेत जाऊन ऑनलाइन शिक्षणाचे धडे देत आहेत,

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

मात्र शाळेत गेल्यामुळे पाच लोकांपेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सुद्धा शंभर टक्के उपस्थिती चे मॅसेज व्हाट्सऍप वर फिरत आहेत. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोना होतो आणि शिक्षकांना होत नाही! असे उपहासात्मक या मॅसेज वरून बोलल्या जात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश नसल्याने प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक निर्णय घेऊन तमाम शिक्षकांना कळवावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून केल्या जात आहेत.

अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू