अकोला : कारंजात आरोग्य यंत्रणेचा वनवास सुटणार कधी?

रिक्त पदांचा अनुषेश कायम; गोरगरिबांची हेळसांड कायमच
अकोला : कारंजात आरोग्य यंत्रणेचा वनवास सुटणार कधी?

कारंजा : ऐतिहासिक आणि व्यापारी नगरी अशी कारंजाची(karanja) ओळख असली तरी, आता आरोग्याच्या बाबतीत समस्येचे माहेरघर म्हणून दुर्दैवी ओळख निर्माण होत आहे. रुग्णालयातील रिक्त पदांचा तिढा कायम असून, गोरगरिबांना नाहक खासगी रुग्णालयात (private hospital)उपचार घ्यावे लागत आहेत.

कारंजा उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज ईमारतीची आवश्यकता होती. दिवंगत माजी आमदार प्रकाश डहाके(prakash dahake) यांनी यासाठी प्रयत्न करत लाखो रुपयांचा निधी खेचून आणला व ईमारतीच्या कामास सुरुवात झाली. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाची ईमारत पूर्ण बांधून झाली आहे. मात्र, अद्यापही येथील ७५ पैकी ३६ पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे डॉक्टर(doctor) व कर्मचाऱ्यांशिवाय रुग्णालयाचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : कारंजात आरोग्य यंत्रणेचा वनवास सुटणार कधी?
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

खाजगी रुग्णालयाचा आर्थिक भार पेलत नसल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब प्रवर्गातील येणारे बहुतांश नागरिक उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. सोयीसुविधा पूर्ण असल्या तरी त्या पुरवण्यास मनुष्यबळाची कमतरता आहे. परिणामत: मोठ्या तबक्यास शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागते आहे.

रुग्णालयाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमीका बजावणारे वैद्यकीय अधीक्षकाचे पद मंजूर झाले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतचिकीत्सक अशी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे स्त्रीरोग व दंतरोगासंबंधित व्याधी असणाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेपासून उपेक्षित राहावे लागते आहे. अधिपरिचारिकांसाठी एकूण २७ पदे मंजूर झाली असतांना सुद्धा काही पदेच भरण्यात आली नाहीत. यामुळे यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. कोरोना काळात यंत्रणेवर ताण आल्यामुळे रुग्णाच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण न झाल्याचे अनेकदा बघायला मिळाले. कोरोनाकाळात रुग्णांच्या सेवेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अधिपरिचारिकांचे एकूण २१ पदे रिक्त ठेवण्यात आले आहेत.

अकोला : कारंजात आरोग्य यंत्रणेचा वनवास सुटणार कधी?
नाशिक : श्रीराम, सीता शिल्पाचे दर्शन दुरूनच जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पर्यटकांची नाराजी

"कारंजा ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदाबरोबरच आधुनिक मशीनचीही आवश्यकता आहे. या संदर्भात मी आरोग्यमंत्री राजेश (rajesh tope) टोपे यांच्याकडे मागणी केली आहे तसेच या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा करणार आहे. कारण हे रुग्णालय सुविधेसह अद्यावत होणे आवश्यक आहे. हजारो गोरगरिब जनतेची हेळसांड होत आहे. लवकरच यावर कारवाई होवून कारंजातील जनतेला अद्ययावत रुग्णालय उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे."

- युसूफ पुंजाणी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कारंजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com