मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

मेहकर/घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील जनुना येथील गजानन संपत गवई हे गेल्या 15 वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने मेहकर शहरात वास्तव्याला आहेत. ते चिखली तालुक्यातील अमडापुर येथे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. परिवारातील सर्व सदस्य आनंदात राहत होते. परंतु, सुखी संसारात पाल चुकचुकली अन् 29 मे रात्रीच्या वेळी अंदाजे 9 वाजेदरम्यान मुलानेच जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना घडली. (boy hit his father in Mehakar buldana crime news)

शहरातील समता नगरात राहात असलेले गजानन संपत गवई (वय 55 वर्ष) हे घरात पती, पत्नी व एकुलता एक मुलगा शुभम (वय 21 वर्ष) हे सुखी संसारात समाधानी होते.

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून
इंग्रजी राजवटीतील दुर्मिळ १० हजाराची नोट जपलीय अकोल्याच्या संग्रहात

शुभम हा औरंगाबादमध्ये येथे इंजिनिअरिंग दुसर्‍या वर्षाला शिकत आहे. 29 मे ला रात्री गजानन संपत गवई हे आराम करीत असताना शुभमने रागाच्या भरात कुर्‍हाडीने सपासप वार करून जन्मदात्या बापाचा निर्घृण खून केला. बापाच्या डोक्यावर, मानेवर कुर्‍हाडीने वार करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बापाला पाहून परिसरातील नागरिक हादरलेले होते.

तिकडे मुलगा शुभम हा स्वत:हुन पोलिस स्टेशनच्या आवारात भटकत होतो. आशा पतीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून जोरजोरात हंबरडा फोडत करत नवरा गेला म्हणून आक्रोश करत होती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्या आईला कोणी समजावत नव्हते. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यमावार व पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय घुले, गणेश लोंढे व पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून
Video: जपान, कोरिया, अमेरिकेतील माजी विद्यार्थ्यांचा अकोल्यातील 'अन्नपेढी'स मदतीचा हात!

शुभम याला संपर्क केला असता तो पोलिस स्टेशन जवळ घुटमळत होता. त्यास पोलिसांनी शुभमला अटक केली. हत्या करताना वापरलेली कुर्‍हाड जप्त करून आशा गवई च्या तक्रारीवरून शुभम मनोरुग्ण होता. त्यानुसार शुभमवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व मेहकर न्यायालयात हजर केले आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी विलास यमावार व ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय घुले करत आहेत.

शुभम आहे मनोरुग्ण
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार शुभम हा मानसिक रुग्णांचे उपचार चालू होते. तो घरात नेहमी चिडचिड करत होता. सतत मोबाईलवर खेळत होता. त्यातूनच जन्मदात्या बापाचा निर्घृण खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

boy hit his father in Mehakar buldana crime news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com