esakal | सिंदखेड राजा; लॉकडाउनचा बंद, व्यवहार सुरूच!
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana News Sindkhed Raja; Lockdown closed, transactions continue!

तालुक्यामध्ये लॉक डाउन मध्ये बंदआड व्यवहार सुरूच असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन खरंच कार्यवाही करते काय? याकडे तालुक्यावाशीयांचे लक्ष लागले आहे.

सिंदखेड राजा; लॉकडाउनचा बंद, व्यवहार सुरूच!

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) : तालुक्यामध्ये लॉक डाउन मध्ये बंदआड व्यवहार सुरूच असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन खरंच कार्यवाही करते काय? याकडे तालुक्यावाशीयांचे लक्ष लागले आहे.

सद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी तारीख २६ फेब्रुवारी रोजी आदेश निर्गमित करून शनिवार व रविवारी रोजी दुकाने ,आस्थापने , प्रतिष्ठाने ,बंद राहण्यासाठी आदेश केला होता.परंतु जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांच्या आदेशालाच सिंदखेड राजा तालुक्यातमध्ये प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सद्या ग्रामीण भागामध्ये झपाट्याने कोरोनाचा प्रसार होतांना दिसुन येत असुन त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तारीख २७ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार सद्या तालुक्यामध्ये ८० कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४६ तर शहरी भागामध्ये ३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना च्या विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे.

संचारबंदी व लॉकडाउन फक्त शहरी भागांमध्ये पहायला मिळत परंतु ग्रामीण भागाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागांमध्ये लॉक डाउन व संचारबंदी कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टंसिंग व मास्क वापरत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तालुक्यातील सिंदखेड राजा शहर ,किनगांव राजा , राहेरी बु, जांभोरा, दुसरबीड , मलकापूर पांग्रा , शेंदुर्जन , साखरखेर्डा , यासह अनेक ग्रामीण भागांतील गांवामधील दुकानाचे व्यवहार संचारबंदी व लॉकडाउन सुरू असल्याने पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करून दुकानदारांना व नागरिकांना शिस्त लावण्याचे गरज निर्माण झाली आहे.


संचारबंदी व लॉक डाउन मध्ये अशा चालतो व्यवहार

सिंदखेड राजा नगर परिषदेत हद्दीमध्ये लॉक डाउन जाहीर करण्यात आलेला आहे,त्यानंतर शनिवार व रविवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यामध्ये लॉक डाउन व संचारबंदी करण्यात आलेली आहे. परंतु निर्बंध असतांना सुद्धा तालुक्यामध्ये दुकाने व भाजीपाला यासह अनेक दुकाने सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. किराणा दुकान व इतर दुकानामधुन व्यवहार सुळलीत चालत असल्याचे पहायला मिळत आहे.दुकाना समोर एक व्यक्ती ठेवला जातो. त्यानंतर ग्राहकांना ज्या वस्तु घ्यायच्या आहेत , त्या त्यांना सांगितल्या जातात. त्यानंतर सदरचा व्यक्ती हा दुकानामध्ये जावून ग्राहकांना वस्तु पुरविल्या जातात अशा प्रकारे लॉक डाउन व संचारबंदी असतांना सुध्दा सिंदखेड राजा तालुक्यामध्ये व्यवहार सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

ग्राम स्तरावरच्या समित्या कागदावरच
सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ग्राम स्तरावच्या समित्या कागदावरच पहायला मिळत आहे. त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढत असून पहायला मिळत आहे. शासनाने कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश आहेत. परंतु तालुक्यातील गांवातील समित्या ह्या फक्त कागदावरच पहायला मिळत आहे. ग्राम स्तरीय समितीमध्ये तलाठी ,ग्रामपंचायत सचिव , पोलीस पाटील ,बिट जमादार ,आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका ,कृषी सहाय्यक ,ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. त्यांनी कोरोना बाबत उपायोजना व जनजागृती करून नागरीकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. परंतु या ग्राम समित्या कागदावरच पहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राम समित्यकडे लक्ष देवुन ग्राम स्तरावच्या समित्या कार्यान्वित करावे अशी मागणी होत आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

0

कोरोनामुळे उडू शकणार नाही ड्रोन!

0

70 फुट खोल विहिरीत तरंगत होता मृतदेह, रात्री दोन वाजता सुरू झाले सर्च ऑपरेशन

0

Video: अपघातात आले अपंगत्व, उपचारालाही पैसे नाहीत, अठराविश्व दारीद्र्याचा अनुसुया ओढते गाढा

0

पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

0

चार अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती !

loading image